कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

shrikant Damle
कातळ...

गहिवरले कातळ आज हळवे झाले
लाटांनी चिंब झाले मायेने पाझरले
जलबिंदुनी चमकले काळेभोर डोळे
भेटीतले ते क्षण मनकपारीत ओले.....

प्रणयचकोर भिरभिरले अंगी विसावले
धुंद प्रणयलहरींनी किनारे सुखावले
कपारीतले रानपात हलकेच शाहारले
निरोप देताना काळे कातळही पाणावले

झाकोळले आभाळ हे सांजमेघ दाटले
वार्यानी भणाणले कातळ ओलेचींब झाले
फुलांचे निर्माल्य वाहात कातळाशी आले
ओंजळ फुलांची घेवुन कातळ मुक झाले...

श्रीकांत...(१९-०९-२०१५)