कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

shrikant Damle
माहापूर....

मनातला नाजुक प्रेमभाव
आज नकळत तरुण झाला
अनेक वर्षानी सखा समोर आला
क्षणभर माझा वास्तव भुतकाळ
वर्तमान होवूनी समिप आला
जपलेल्या त्या गत आठवणींचा
आज डोळ्यात माहापूर आला..


क्षणभर या वर्तमानतल्या त्या
दिवास्वप्नांचा अाज ध्यास लागला
तो आनंदी आठवांचा भुतकाळ
क्षणभर वर्तमानातही मी जगला
पण वास्तव आजचे समोर पाहता
स्वप्नांचा तो बुडबूडा तेथेच फुटला
जपलेल्या त्या गत आठवणींचा
आज डोळ्यात माहापूर आला....


बहरलेली त्याची ती संसारवेल
पाहुन माझा जीव गंभीर झाला
त्याकाळी घेतलेल्या चुकीच्या
निर्णयाचा आज पश्चाताप झाला
प्रेम आठवणींचे झालेले तुकडे
वेचुन तेथेच निरोप त्याचा घेतला
जपलेल्या त्या गत आठवणींचा
आज डोळ्यात माहापूर आला...


श्रीकांत... (8-1-2016)