कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

shrikant Damle
आत्मबोध...

ज्ञानवृक्षाच्या ओवीवर ओवी फुलली
आत्मतत्वाची बीजांकुरे फळा आली
अमृतानुभवी प्रज्ञा प्रचितीत न्हाली
ओवीची अनुभूती ओवीतुन अंकुरली..

कर्ममार्ग फलांनी कर्मदेह गुंतीयेला
आसक्तीत पदार्थाच्या देह सांडीयेला
जाणिव नेणिवेची आत्मबुध्दीस झाली
ओविची अऩुभूती ओवीतुन अंकुरली..

नयनी देखीले ते व्यर्थ मायाभुत सारे
क्षणभंगुर जग हे भासे मृगजळ सारे
माऊलीच्या मुखी आत्मरुपे आकारली
ओविची अनुभूती ओवीतुन अंकुरली....

ज्ञानतत्वातुन सारे विश्व आकारले
सगुण रुपाने ते निर्गुणातुन प्रकटले
अमुर्त शलाका दिव्यचक्षुनी पाहिली
ओविची अनुभूती ओवीतुन अंकुरली

( हि कविता ज्ञानोबा माऊलीच्या चरणासी अर्पण करतो)

श्रीकांत.....(१४-०५-२०१५)