कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

shrikant Damle
....अनुबंध...


प्रतिभेच्या वेलीवरती भिजली
अवघ्या आठवणींची लक्तरे
कशा या रेशमी प्रश्नांना देवु
तुझ्या मी मखमली ही उत्तरे....

शब्दांनी सजली स्वरावली
ती कविता स्फुरली अंतरी
संवाद खुंटला अंतरामधला
उरली ध्रुवपदांची मध्यंतरे.....

सावरुन घेतो तुझीया शब्दांना
वेदना या मनाच्या आवरताना
स्मरलीस जरी या प्रतिभेतही
नाही सुचत कडव्यांचे अंतरे.....

शब्दांच्या या सुखद भावनांचे
रेशमी अनुबंध आज दुरावुनही
आठवतात आजही मनात या
तुझ्या शब्दा शब्दातली अंतरे.....

श्रीकांत...(१७-०४-२०१५)