|
जात जात म्हणून स्वीकारायची नसेल तर
जात जात जात सांगू नका
जात जात म्हणून जात घ्यायची असेल तर
जात जात जातीलाच नाही म्हणू नका
जात जात आहे हे माहित असल तरी
जात जात जातच का असं विचारू नका
जात जात मानायची नसेल तरी
जात जात करत बसू नका
जात जात कधी फुसायची असेल तर
जात जात जातीवर बोलू नका
जात जात कधी जात संपवायची असेल तर
जात जात म्हणत जातीला खत पाणी घालू नका
प्रणव प्रभू
|