शोधा आपल्यातला समाधानी व्यक्ती !

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

शोधा आपल्यातला समाधानी व्यक्ती !

Kavitamahajan
माणसाचं मन किती सैरवैर असतं ना ! जे आहे त्यात समाधानी राहण्यापेक्षा जे नाही त्याच्यामागे धावत असतं. आता हेच बघा ना , अंग झाकायला वितभर कपडे मिळाले तरी mall मधल्या महागड्या कपडयाची हाव चढते , रहायला झोपडी मिळाली की बंगल्याची हाव चढते , पोट भरायला भाजी-भाकरी मिळत असली तरी महागडया हॉटेलमध्ये रांग वाढते . आहे त्यात आपण सुखी-समाधानी कधीच राहत नाही आणि एवढं मिळूनसुद्धा आपल्या चेहऱ्यावर तक्रारीचेच भाव असतात . पण आपण कधी आजुबाजुला बघतो का ? रस्त्यावर झोपणारे वृद्ध , उघडयावर खेळणारे लहानमुलं डोक्यावर छत नाही, पांघरायला पांघरूण नाही,पोटाला पुरेसं अन्न नाही  पण तरीही त्यांचे चेहरे सदा हसरे , खेळकर . का ? कारण जे आहे त्यात ते समाधानी आहेत .
             आज सकाळच दृश्य बघून हा विचार मनात आला . सकाळी सकाळी एक ट्रक घरासमोर येऊन उभा राहिला . तो विटांनी भरलेला होता  आणि जणू त्या विटांची गादी करून त्यावर झोपलेले कामगार  बघितले.  ते  इतके शांत झोपले होते की , त्या विटाही त्यांना टोचत नव्हत्या आणि सूर्याचे किरणही त्यांना बोचत नव्हते .तरिहि त्यात ते समाधानी कारण आहे त्यात ते सुखी आहे .
            आपलं मात्र तस नसतं सतरंजी मिळाली की आपल्याला स्लीपवेल च्या गाद्या हव्या असतात आणि तरीही आपलं अंग दुखाणारच ! कारण आपल्यातली व्यक्ती खऱ्या अर्थाने समाधानी  नाहिच . आज सर्वोतोपरी सुखाच्यामागे धावताना आपल्यातलं माणूसपण आपल्यातली व्यक्ती मात्र कुठेतरी हरवली आहे आणि ह्या सिमेंट कॉक्रिट च्या जगात सुखी व्हायचं असेल तर आपल्यातल्या त्या समाधानी व्यक्तीचा शोध घ्यायला हवाच .  

© कविता महाजन  


कविता महाजन
kavitapatil12@gmail.com