कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

Kasturimitra

सांग सखे मज आता
नेमके काय घडले होते
तू मेघ अडवताना
मी डोळे पाहिले होतेहास्याचे फुल बहरताना
नेमके काय लपवले होते
तू अश्रू आवरताना
मी डोळे पाहिले होतेशब्दाचे गजरे ओवताना
नेमके काय राहिले होते
तू नजर चुकवताना
मी डोळे पाहिले होतेमनीचे दुःख सांगताना
नेमके काय झाले होते
तू दूर निघून जाताना
मी डोळे पाहिले होते
     प्रणव प्रभू