कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

Kasturimitra

तूच सांग ग आता हे प्रेम म्हणजे नेमकं काय असतं ?
रात्र रात्र जागणं कि
स्वप्नात त्या हरवणं
तुला सगळीकडे शोधणं कि
तुझ्या जवळच राहणं

तूच सांग ग आता हे प्रेम म्हणजे नेमकं काय असतं ?
हळूच तुला पाहणं कि
तुझा पाठलाग करणं
तुझी वाट बघणं कि
तू समोरून आल्यावर लपणं

तूच सांग ग आता हे प्रेम म्हणजे नेमकं काय असतं ?
तुझं नाव हातावर लिहिणं कि
तुला मनात ठेवणं
तुला शब्दात मांडणं कि
तुझ्यावर कविता करणं प्रणव प्रभू