कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

Kasturimitra

तुला शब्दात मांडताना
शब्द थोडे कमीच पडतात
नवीन शब्द बनवताना
अक्षरे आशेने माझ्याकडे बघतात


तुला स्वप्नात पाहताना
रात्र थोडी कमीच पडते
दिवसा तुला शोधताना
डोळ्यांचे या भान हरतेतुला हृदयात ठेवताना
कप्पे थोडे कमीच पडतात
मनात सामवेन म्हणताना
इतर इंद्रिये रुसून बसताततुला कल्पनेत रेखाटताना
कल्पकता थोडी कमीच पडते
कागदावर तुला उतरवताना
बोटंमध्ये स्पर्धा लागतेतुला एकांती शोधताना
दहादिशा थोड्या कमीच पडतात
तुला कुठे शोधु विचारताना
सगळे माझ्याकडे  पाहतच राहतात


         प्रणव प्रभू