कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

Kasturimitra

आज तिला घेऊन
 हॉटेलची परत पायरी चढलो
गरम होतंय तिने म्हणताच
 फॅनच्याखाली जाऊन बसलो


गप्पा सुरु होण्याआधीच
मेनूकार्डकडे तीच लक्ष गेलं
काय घ्यायचं म्हणण्याआधीच
तिने कोडं सोडवून दिलं


सुरवात कुठून करावी
हा नेहमीचा प्रश्न पडलाच होता
विनाकारण मेनू पाहण्यात
जीव थोडा रमला होता


इकडे तिकडे पाहून
तिनेच गप्पांना सुरवात केली
आवडी निवडी वरती पुन्हा
खूप वेळ चर्चा रंगलीऑर्डर घेऊन येताच
तिने मोर्चा तिकडे वळवला
आजी मी ब्रह्म पाहिल्या सारखा
तिच्या डोळ्यात आनंद दिसला


दरवेळी सारखं तिच्या ऑर्डर ने
मला गप्प बसण्यास भाग पाडलं
तिच्याकडे चोरून पाहत
मीपण थोडं खाऊन घेतलं


तीचं पोट भरताच
नेहमीच नाटक सुरु झालं
कोल्डकॉफी आणि फिंगर चिप्सच बिल
पुन्हा माझ्याच पदरी आलं   

   प्रणव प्रभू