कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

Kasturimitra

याच जन्मी कुणीतरी आपलच होऊन आपणास मिळावं
एकटेपणाच्या जखमेवर प्रेमाचं मोरपीस फिरावं


नातं कोणतही  असो त्याच्या प्रत्येक क्षणात माझं अस्तित्व दिसावं
कितीही लांब असलो तरी त्याच्याच  जवळ आहोत अस जाणवावं


कधी रुसलो कधी हसलो तर त्याला कारण नसावं
काही सांगण्या आधीच त्याने सगळं समजून घ्यावं


लपवलेलं दुःख मनापासून त्याच्या मनापर्यंत पोचावं
माझ्या हृदयातील गुपित त्याच्या हृदयाला जावून भिडावं
                  प्रणव प्रभू