कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

Kasturimitra

तिच्यात अन कॉफीमध्ये फरक ऐवढाच
ती गोड अन कॉफी थोडी कडवट


कॉफीचा दरारा हा तिच्यापेक्षा थोडा कमीच
पण आपल्या हातावर अवलंबून राहिलेला


तिची नशा जरा जास्तच कॉफीच्या एका घोटासरशी अजून वाढणारी
अन तिच्या जवळच ठेवणारी


कॉफीची तलप सांगून नयेणारी
पण तिच्यासमवेत असताना मिलनातील बंध घट्ट करणारी


तिचा आग्रह पण असा त्यात कॉफीच असणं
तिच्या वाचून सार अधुर त्यात कॉफीच बोलावणं


कॉफी बनवणं तस सोप
पण तिच्या हातून बनलेलं ते रसायन म्हणजे एक वेगळच मिश्रण


तिचा नेहमी हट्ट मला भेटण्याचा
अन मला नेहमी आनंद तिच्या हातची कॉफी पिण्याचा


कॉफीवरील प्रेम तसं नेहमी वाढतच जाणार
तिच्या जवळ नेऊन परत दूर करणार
      प्रणव प्रभू