कसे सावरू सांग ना,माझ्या वेड्या मना,,,

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कसे सावरू सांग ना,माझ्या वेड्या मना,,,

Sangieta
आभाळ आणि मन दोन्ही एकसारखेच असतात ना,आभाळ भरून येतं, तसं माझं मन हि तुझ्या आठवणी ने भरून येते,आभाळ भरलं कि पावसाच्या रूपानं कोसळते आणि पूर्णपणे रिते तरी होते,पण माझ्या मनाचं काय? ते  कसं मी रिते करू कोणा सोबत करू? तुझी वाट पाहणं, तुझ्या आठवणींवर जगणं, तु समजतोस तितके सोपे आहे का? तू तर निघून गेलास तुझं मन माझ्या समोर मोकळं करून,तुला जे वाटलं,जे जाणवलं,जे तू अनुभवलं,पण एकदातरी मला विचारलंस का कि मला काय वाटत? माझ्या तुझ्या बद्दल काय भावना आहेत,? नाही,तुला मला काही विचारावेसे वाटलेच नाही,बस्स तू सगळं बोलून निघून गेलास, तुझ्या माघारी मला काय वाटतं असेल,मी कशी जगत असेन? असे प्रश्न नाही का रे पडले तुला कधी? कधी तरी जाणून घेण्याचा प्रयत्न तरी कर,मी हसते कि तुझ्या आठवणीत रडते,हे पाहायला तरी एकदा ये,किती सोपं असतं ना,समोरचा कितीही डोकेफोड करू दे,आपण तोंडाला कुलूप लावून बसायच,,तुझ्या त्या भावना,आणि माझ्या भावना म्हणजे माती का? खुपदा मनात येत सगळं बोलावं तुझ्याशी पण तू कुठे आहेस ऐकायला,मला समजून घ्यायला? नुसते माझे आपले म्हणून कोणी आपलं होत नसते हे नाही समजले तुला,आपलं म्हंटलं एखाद्याला तर तसा हक्काचा आपलेपणा पण असावा लागतो,न बोलता न सांगता मनातलं ओळखता यावं लागतं. खूप सांगायच आहे तुला,मनाच आभाळ तुझ्या सोबत रीत करायचं आहे,तुझ्यात एकदा सामावून जायचं आहे,सगळं काही विसरून,हा समाज हे लोक,,बस्स तुला माझा म्हणायचं आहे, आता नाही सहन होत तुझा अबोला,तुझं शांत राहणं, तुझं परक्यासारखं मला वागवन,,!!! एकदा विचार करून बघ माझ्या नजरेतून,बोलून तर बघ माझ्या शब्दातून,न सापडणाऱ्या कोड्यांची उत्तरे मिळत जातील,सगळं कसे छान आणि सुंदर होइल, तूच सांग कशी सावरू मी माझ्या वेड्या मनाला,,ह्रुदयात गॊठवून ठेव माझ्या शब्दांना,,तेव्हाच मिळेल अर्थ माझ्या भावनांना,,,!!!!!!,,,,,संगीता,,,,,
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कसे सावरू सांग ना,माझ्या वेड्या मना,,,

Pankaj
Don't Worry
Be Positive
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कसे सावरू सांग ना,माझ्या वेड्या मना,,,

Kavitamahajan
khup mast
कविता महाजन
kavitapatil12@gmail.com