पार्ट ऑफ लाईफ..

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

पार्ट ऑफ लाईफ..

Shashank kondvilkar
बरेच दिवस विचार करत होते.. पण वेळ मिळत नव्हता..
आज काही तो सोक्षमोक्ष लावूनच टाकूया..
हे बघ आज मी तुझं काहीच एकणार नाही उलत आज
तुलाच माझं ऐकावं लागेल..

किती निष्ठूर आहे रे तू.. तुला माझी जरा ही काळजी नाही..
सतत कामात असतोस..थोडा माझ्यासाठी ही वेळ काढ ना..
मी आपली सारखी तुझी वाट बघत असते.. तु आज वेळ
देशील.. उद्या वेळ देशील पण छे.. तू आपला आपल्याच तंद्रीत..

एक विचारु एवढं काम करुन.. पैसा कमावून शेवटपर्यंत पुरणार
आहेत का?... आज जेवढा कमावणार त्यापेक्षा डब्बल आजारपणात
खर्च होईल... मग काय करणार तू .. अंथरुणाला खिळून बसणार का??

आता पर्यंत तुझे बरेच लाड पुरवले मी.. यापुढे नाही जमणारं हं...
अरे आता मी वयाची पन्नाशी ओलांडलीए.. हे तरी तुला कळायला हवं..
तू राबराब राबतोस.. आणि त्याचा त्रास मला मेलीला...

काय म्हणतोस.. मुलं!.. मुलांचं काही सांगू नकोस..
अरे बाबा त्यांचा आता स्वतंत्र संसार आहे..
ते थोडीच ऐकणार आहेत माझ्या म्हातारीच...

त्यांना कोण सांगणार..
त्यांच्या ' स्वप्नांसाठी ' आपण सत्यात झटलोय..
पण त्यांच्या ' सत्यात ' आपण केव्हाचेच विटलोय..

any ways..विषयांतर नको...
या पुढचा तुझा प्रत्येक क्षण मला हवा आहे..
कारण खरं तर तुच माझ्या जगण्याचा दुवा आहे..
अधु-या आकांक्षांना पुन्हा नव्याने उभारी द्यायची आहे रे..
क्षितीजा पलीकडच्या स्वप्नांना नवी भरारी द्यायची आहे रे..

आणि तुझ्या साथी शिवाय ते कदापी शक्य नाही..
हे तुला ही माहिती आहे.. कारण ' शरीरा ' शिवाय...' मी '
एकटी  काहीच करु शकत नाही..
मग देशील ना साथ?.. जीवनाच्या अंतापर्यंत...!

                                                - शशांक कोंडविलकर

Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पार्ट ऑफ लाईफ..

ramakant1568

फारच छान....

On Mar 31, 2016 8:41 AM, "Shashank kondvilkar [via ई-साहित्य]" <[hidden email]> wrote:

Shashank kondvilkarIf you reply to this email, your message will be added to the discussion below:
http://x.2286687.n4.nabble.com/-tp4641420.html
To start a new topic under ई-साहित्य, email [hidden email]
To unsubscribe from ई-साहित्य, click here.
NAML
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पार्ट ऑफ लाईफ..

Man Udhan Varyache~nilu
In reply to this post by Shashank kondvilkar
kupch chan...