'मी' पण

classic Classic list List threaded Threaded
4 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

'मी' पण

Shashank kondvilkar
अस्ताला चाललेल्या प्रतिभेच्या शिखराची..
आज त्याला तमाच नव्हती..
तो फक्त प्रस्थापित अस्तित्वाशीच जगडत होता.. एकटाच!
जन्मभर हाजी हाजी करणा-यांनी आज अचानक पाठ फिरवावी..
इतके कसे गाफील राहिलो आपण .. यायाच कदाचित विचार चालला असेल..त्याच्या मनाच्या गाभा-यात..
ऐश्वर्य पैसा ऐयाशी..सारं काही उपभोगलं.. अगदी बेफिकीरपणे..
पण पुन्हा आईच्या कुशीत मायेनं शिरता नाही आलं.. कसली ही शोकांतिका..!
आज ना उद्या श्वास ही थांबतील सोबतीचा करार तोडून..मग काय राहिल या नश्वर देहात...हं... फक्त हाडांचा सापळा!!!!

असंच काहीसं झालं आहे आपलं जगणं.. स्पर्धेच्या युगात जगाशी स्पर्धा करता करता.. आपणच कधी 'स्पर्धा' बनलो कळलंच नाही..
पैशासाठी नाती तोडली.. आणि आभाळाला गवसणी घालण्याच्या नादात.. माती ही सोडली..
आता फक्त जपतोय तो..शिष्टाचार! ... सोबतीला भ्रष्टाचार  व्याभिचार आहेतच तग धरुन..
आपुलकी तर पानातल्या मिठासारखी राहिलेय.. चवीपूरती.. कधी संपेल कळणार देखील नाही... हो पण त्या मिठाची किंमत.. हं.. ती नाही ठरवता येणारं..

हे कुणासाठी..बायकोसाठी.. हे.. मुलांसाठी.. हे नातलगांसाठी.. सारं काही सगळ्यांसाठी  करतोय पण स्वतःसाठी काय.. एक दिवस हेच म्हणायची वेळ येईल
" माझं माझं म्हणत होतो मलाच त्यांनी सोडलं..
ज्यांच्यासाठी जगत होतो त्यांनीच घरटं मोडलं."

खरं तर खुजेपणाच्या बढाईतच आपण धन्यता मानायला लागलो आहोत..
पण त्याच समाधान कधी पर्यंत....???
कुटुंबासाठी करणं कर्तव्य आहे.. पण स्वतःसाठी जगण्यात ही जीवनाच सार्थक आहे..
नाहीतरी शेवटी  "हे सालं करायचं राहून गेलं" अशी म्हणायची वेळ आली तर कुणाला दोष देणार???
 अजून ही वेळ गेलेली नाही... विचार करा!!

   - शशांक कोंडविलकर


                                                                            

Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: 'मी' पण

Mohan Kumar
Thanks.

khup bare watle wachun. kharech aayush evdhe complicated banat chalale ahe ki thamblo tar sampel hi bhiti kunalch thambu det nahi. aapan ek jivghenya spardhecha kadhi bhag zalo te kalalech nahi.

atta tari thode thambun vichhar kelach pahije pratyekane.

atta tari swatha sathi jagayalch have. nahitar aayush kadhi hatatun sutun jaiel te kalnar hi nahi.

thanks for remeber.
mitra asech lihit jaa. anand milto amhala.

jivan sunder aahe.
Mohan Kumar -
Ek Pravasi...
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: 'मी' पण

Shashank kondvilkar
खूप खूप आभार सर.. आपल्या इतक्या छान अभिप्रायामुळे नक्कीच नवनवीन लिहिण्याची उर्मी मिळेल.. लोभ असावा!
Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: 'मी' पण

VIREN
तुम्हाला मिळाली कि मला पण द्या थोडीशी उर्मी लिहिण्यासाठी 


माफ करा पण मी गम्मत केली कारण मी इतका मोठा नाही कि माझ्या अभिप्रायामुळे तुम्हाला उर्मी मिळावी असो खूप सुंदर आहे सगळच लिखाण

2016-03-13 23:39 GMT+05:30 Shashank kondvilkar [via ई-साहित्य] <[hidden email]>:
खूप खूप आभार सर.. आपल्या इतक्या छान अभिप्रायामुळे नक्कीच नवनवीन लिहिण्याची उर्मी मिळेल.. लोभ असावा!
Shashank kondvilkarIf you reply to this email, your message will be added to the discussion below:
http://x.2286687.n4.nabble.com/-tp4641387p4641393.html
To start a new topic under ई-साहित्य, email [hidden email]
To unsubscribe from ई-साहित्य, click here.
NAML