कविता

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

sanjay mane
चर्वण

चरता चरता बैल म्हणाला गाईला
घोळ कधी इतका नव्हता मी पहिला
भा - गवताचे करिता चर्वण मी दाती
छपन्न इंचांची झाली माझी छाती
प्रश्न तरी हा सतावितो ग मज आता
कशास माणूस म्हणतो तुजला गोमाता
दुध ना वर्ज्य असो म्हैस वा असो गाढवी
त्यांस ना म्हणतो माता,कोण त्याला अडवी
लज्जित होते रोज तयांची माता, मुलगी
सहन कशाला करते तुही त्यांची सलगी
नावच यांचे पहिले बघ प्राण्यांची यादी
पशुत्व केवळ उरते यांचे पाहून मादी
सारे प्राणी झाले आजवर भक्ष्य जयांचे
तुझ्या रक्षणासाठी सैनिक दक्ष तयांचे
कळू न येता वळू कसे ते येईल आता
गोमाता माता म्हणता म्हणता होतील "वळू "च आता …
संजय माने ९४२०३२४०२२
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता

engg.shindesantosh

!!!..जय जिजाऊ जय शिवराय..!!!
शिवजयंती निमित्ताने व्याख्यानमाला ....!!!
व्याख्यानासाठी संपर्क: शिवश्री संतोष शिंदे
9657270555

सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्या हिंडून अठरा पगड जातींच्या मावळ्यांसोबत एकत्रित येऊन मराठा साम्राज्य उभारणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी राजे भोसले,यांच्या १९ फेब्रुवारी जयंती निमित्ताने...

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकेक हिरा जमवून हा स्वराज्याचा डाव का मांडला ?
हे बलदंड बाहूचं स्वराज्य  कस उभं राहील?
राजं मी घीतू की सुपारी, आधी लगीन कोंढाण्याच; आण मग रायबाचं...!! म्हणणारे मावळे राजांचे कोण होते ?

हे तडफदार, जहाल आणि तलवारीच्या पात्याप्रमाणे आपल्या ओजस्वी वाणीतून सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातील मावळ्यापर्यंत  पोहचवण्यासाठी सादर आहे;
व्याख्यान विषय - "आभाळाएवढा राजा - शिवछत्रपती"!!!

शिवरायांवरील व्याख्यानासाठी संपर्क :
युवा व्याख्याते शिवश्री संतोष शिंदे
9657270555

On 7 Feb 2016 22:53, "sanjay mane [via ई-साहित्य]" <[hidden email]> wrote:
चर्वण

चरता चरता बैल म्हणाला गाईला
घोळ कधी इतका नव्हता मी पहिला
भा - गवताचे करिता चर्वण मी दाती
छपन्न इंचांची झाली माझी छाती
प्रश्न तरी हा सतावितो ग मज आता
कशास माणूस म्हणतो तुजला गोमाता
दुध ना वर्ज्य असो म्हैस वा असो गाढवी
त्यांस ना म्हणतो माता,कोण त्याला अडवी
लज्जित होते रोज तयांची माता, मुलगी
सहन कशाला करते तुही त्यांची सलगी
नावच यांचे पहिले बघ प्राण्यांची यादी
पशुत्व केवळ उरते यांचे पाहून मादी
सारे प्राणी झाले आजवर भक्ष्य जयांचे
तुझ्या रक्षणासाठी सैनिक दक्ष तयांचे
कळू न येता वळू कसे ते येईल आता
गोमाता माता म्हणता म्हणता होतील "वळू "च आता …
संजय माने ९४२०३२४०२२If you reply to this email, your message will be added to the discussion below:
http://x.2286687.n4.nabble.com/-tp4641339.html
To start a new topic under ई-साहित्य, email [hidden email]
To unsubscribe from ई-साहित्य, click here.
NAML