एक कविता लिहायची आहे...

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

एक कविता लिहायची आहे...

sraut7861
माझी कविता...

मित्रांनो माझी डायरी "आशियाना" या मधलीच एक मराठी कविता.

'एक कविता लिहायची आहे...

कागदावर एका कोय्रा
थोड़ी शब्द जुळवायची आहे
फक्त तिच्यासाठीच मला
एक कविता लिहायची आहे....

हातात घेउनी लेखनी
भावना माडांयची आहे
काम जरा कठिनच
पण सुरवात करायची आहे

फक्त तिच्यासाठीच मला
एक कविता लिहायची आहे....

विचारांची थोडी तगमग
हळूच मिळवायची आहे
मनातली माझी भावना
तिला कळवायची आहे

फक्त तिच्यासाठीच मला
एक कविता लिहायची आहे....

करुन अर्थांची शहानिशा
अशि जादु घडवायची आहे
शब्दांनीच फक्त मला
हि बाग फुलवायची आहे

फक्त तिच्यासाठीच मला
एक कविता लिहायची आहे....

विचारांचा किती गोंधळ
एक शक्कल लढवायची आहे
ओतून प्रेम चारोळीत
काही यमक जुळवायची आहे

फक्त तिच्यासाठीच मला
एक कविता लिहायची आहे....

सुदंर अशी शब्द-सुमनांची
एक रागोंळी गिरवायची आहे
घालून रंग त्यात प्रितीचे
आकर्षित बनवायची आहे

फक्त तिच्यासाठीच मला
एक कविता लिहायची आहे....

भेटून एकदा तिला
सर्व व्यथा सागांयची आहे
लिहुन अशी एक कविता
फक्त तिलाच ऐकवायची आहे

फक्त तिच्यासाठीच मला
एक कविता लिहायची आहे....

-सारंग राऊत
( आशियाना )