परत एकदा शाळेतच गेलो ...

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

परत एकदा शाळेतच गेलो ...

sraut7861
"परत एकदा शाळेतच गेलो"

आठवणित मि माझ्या
परत एकदा शाळेतच गेलो
जाउनी त्याच वर्गात
माझ्या बाकावर बसलो

आठवणित मि माझ्या
परत एकदा शाळेतच गेलो....

शाळेतल्या त्या गणवेशात
मि स्वतालाच दिसलो
आठवून जुने दिवस
मि मनातच हसलो

आठवणित मि माझ्या
परत एकदा शाळेतच गेलो....

ऐकून प्रार्थंनेची घंटा
धावत रागेंतच घुसलो
एकदम सावधान होउन
राष्ट्रगित गात बसलो

आठवणित मि माझ्या
परत एकदा शाळेतच गेलो....

सुरु होताच तास गणिताचा
खाली मान घालून बसलो
सर म्हणाले उत्तर सांग
तेव्हा घाबरुनच उठलो

आठवणित मि माझ्या
परत एकदा शाळेतच गेलो....

जेवन्याच्या मधल्या सुटीत
मित्रांशी खेळन्यातच रमलो
आईनी दिलेला डबा
मि खायचाच विसरलो

आठवणित मि माझ्या
परत एकदा शाळेतच गेलो....

ऐकूनी इतिहास शिवाजींचा
मि स्वतहा: राजाच बनलो
खेळ खेळताना इतिहासाचा
रेतींचे गड जिकंतच सुटलो

आठवणित मि माझ्या
परत एकदा शाळेतच गेलो....

सपंलेल्या खडूंचा भुरका
गोळा करत बसलो
उडवितांना मुलींच्या चेहय्रावर
मि बाईनांच दिसलो

आठवणित मि माझ्या
परत एकदा शाळेतच गेलो....

सपंताच पुर्ण शाळा
घरी धावतच सुटलो
लवकर पोहोचन्याच्या शर्यतीत
मि पावसात चिंब भिजलो

आठवणित मि माझ्या
परत एकदा शाळेतच गेलो....

-सारंग राऊत
( आशियाना )