माझ बेधुंधं मन आणि हा गार वारा

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

माझ बेधुंधं मन आणि हा गार वारा

Sarang Raut
"माझ बेधुदं मन आणि हा गार वारा"

माझ बेधुदं मन आणि हा गार वारा
मनाच्या कोपय्रात लपलाय आसमंतच सारा

पावसाचा थेंब आणि त्याचा स्पर्शच न्यारा
मखमली ढगांखाली जसा दडलाय तारा

उत्साहाची लाट वरुन विचारांचा गारा
दुरुन दिसतय मला सोज्वळ किणारा

श्रावण महिण्यात सुखांचा मारा
त्यात आढळावे अचूक आनंदी ह्या जलधारा

नव्या पालवांचा हा हिरवळ नजारा
मायेची हाक आणि बोचनारा वारा

सोनेरी किरनांची चाहूल सोबत तिचा सहारा
प्रितीचे शब्द आणि प्रेमाचा फुलारा

रंगित हे क्षण आणि पाउस पडतोय जरा
इथेच हवासा वाटतो मला माझा निवारा

मनमोकळ्या पक्षाचां हा एकच चारा
माझ बेधुदं मन आणि हा गार वारा
.
.
माझ बेधुदं मन आणि हा गार वारा
-सारंग राऊत
( आशियाना )
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: माझ बेधुंधं मन आणि हा गार वारा

Sangieta
मस्त,,छान आहे कविता,,
माझे बेधुंद मन आणि हा गार वारा,,
साऱ्या आसमंतात तुझ्या आठवणींचा पसारा,,
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: माझ बेधुंधं मन आणि हा गार वारा

sraut7861
धन्यवाद