असं जगावं मनसोक्त

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

असं जगावं मनसोक्त

Shashank kondvilkar

अगदी मनसोक्त रडून घ्यावं,
सोबत कुणी नसल्यावर..
म्हणजे छान मोकळ हसता येतं,
मैफीलीत बसल्यावर.

हसण्याच सोंग खरं तर;
सहजासहजी जमत नाही,
म्हणूनच हे सुत्र अवलंबून पहावं;
आरंभाचा शेवट असल्यावर.

अगदी मनसोक्त रडून घ्यावं,
सोबत कुणी नसल्यावर..

वेदनांच्या गणितांची ;
सांगड कधीच घडत नाही
आणि धडपडल्या शिवाय;
जगण्याच.. मर्म कधी उलगडत नाही
बोलणा-यास बोलून द्यावं..
शुद्ध चिंतन असल्यावर..

अगदी मनसोक्त रडून घ्यावं,
सोबत कुणी नसल्यावर..
म्हणजे छान मोकळ हसता येतं,
मैफीलीत बसल्यावर.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: असं जगावं मनसोक्त

Sangieta.
सुंदर कविता,,,