माहीत मला

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

माहीत मला

Shashank kondvilkar

माहीत आहे मला;
माझ्या वाचून तुझं तसं काहीच अडणार नाही..
पण माझ्या मनात नक्की काय आहे;
हे देखील तुला कधीच कळणार नाही..
आज मला टाळतेस..अगदी ञयस्थासारखी;
पण 'एक दिवस' माझ्याशिवाय..
तुला दुसरं काहीच स्मरणार नाही..

माहीत आहे मला;
माझ्या वाचून तुझं तसं काहीच अडणार नाही..

येशील सारं विसरुन नव्याने मला सावराया;
पण तेव्हा माञ मला तसं काहीच सलणार नाही.
कारण निपचीत पडलेल्या माझ्या देहाची;
सरणावर होत असेल फक्त लाही लाही..
फक्त लाही लाही....!

- शशांक कोंडविलकर

Shashank kondvilkar