आठवण

classic Classic list List threaded Threaded
6 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आठवण

Aditi
खूप काही आठवत कधीकधी अचानक, नको असलेले पण हवेहवेसे.सुई टोचली कि कस वाटत तसाच एकदम अंगावर काटा येतो आणि सगळ्या आठवणी जाग्या होतात.विचारांचं चक्र चालू होत आणि काळाच चक्र मागे जात.परिस्थिती माणसाची वृत्ती बदलवते पण त्याच्या भावना बदलणं फार कठीण असत,म्हणूच आठवणीना फार घाबरतो माणूस. कारण त्याच्या मनाला सर्वात जास्त आठवणीच कमजोर करतात,अर्थात कधी कधी हसवतात सुद्धा. एखाद्या वाळलेल्या फुलांच्या पाकळ्याप्रमाणे त्या मनाच्या कोपर्यात पडून राहतात. कधीतरी अचानक बघावं आणि नंतर पुन्हा पुस्तक बंद कराव तशी आठवण येते आणि मग पुन्हा थोड्यावेळासाठी का होईना पण भूतकाळात नेते.

सोनेरी  भविष्याचे स्वप्न बघताना कधीतरी भूतकाळ आठवतो आणि मग क्षणिक का होईना पण मनाला लहान करतो कारण मनाला वायाच बंधन कुठे असत.फुलपाखरासारखी उडल्यावर हातात फक्त ठसे राहतात आठवणींचे अगदी  हलकेसे.

मग काय त्या अलगदपणे पुसून पुन्हा  वर्तमानात यायचं आणि पुन्हा नवीन क्षण जगायचा त्याची पण आठवण  होईपर्यंत.

--अदिती
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आठवण

jaywant jangam (JJ)
khup chan , kharch athvani visarta yet nahit ,ani visravya tya athvani hot nahit.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आठवण

kalyani
so nice.....
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आठवण

Abhiman
Punha Vartman kalat yene khup kathin aani nakose ... :-)
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आठवण

shubhangi pathak-joshi
In reply to this post by Aditi
So nice.... it's very true
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आठवण

ankita
khup chhan lihily ....khrch ya aathvnich jgnyacha aadhar astat kadhi hvya hvyashya tr kdhi nkosha hotat