दुधसागर ! अद्भुत अनुभव !!

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

दुधसागर ! अद्भुत अनुभव !!

gherade.snehal
"दुधसागर " नुसते नाव घेतले कि डोळ्यासमोर जे  चित्र उभ राहत अगदी तसाच अनुभव अनुभवयास मिळतो जेव्हा आपण "दुधसागर " हा धबधबा प्रत्यक्ष  डोळ्यांनी पाहतो.
दुधसागर हे गोव्यामधील एक प्रसिद्ध ठिकाण (रेल्वे स्टेशन) . पावसाळ्यात निसर्गप्रेमीं इथे आवर्जून भेट देतात. २०१४ साली मला पण इथे जाण्याचा योग आला. तुम्ही गाडीने जाणार असाल तर योग्य दिशा दाखवणारा हा  एक पिवळ्या रंगाचा लागतो जो आम्ही रात्री ११ वाजता पहिला आणि सुटकेचा निश्वास टाकला.
बोर्ड
पुढल्या सकाळी आम्हाला  इथेच यायचा होता त्यामुळे जवळपासच आम्ही रूम शोधू लागलो , पण या परिसरात "दुधसागर रेसोर्ट " हे एकमेव राहण्याच ठिकाण असून दुसरा कोणताही पर्याय इथे नाही आहे. या बोर्ड पासून आत  डाव्या हाताला जाणारा रस्ता आपल्याला  जवळ घेऊन जातो.या स्टेशनच्या आजूबाजूला असलेल्या स्थानिक लोकांच्या घरांमध्ये राहण्याची व्यवस्थित सोय होऊ शकते आणि हे लोक देखील अत्यंत प्रेमाने आणि अगदी मुबलक दरात आपले आदरातिथ्य करतात. दुसरा आणखी एक पर्याय म्हणजे या ठिकाणापासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या लोंढा या मध्यवर्ती ठिकाणी राहण्यासाठी बऱ्यापैकी लॉज उपलब्ध आहेत.
आम्ही सकाळी लवकर उठून, पोटभर नाश्ता करून कॅस्सेल रॉककडे निघालो.  वाटेतच आम्ही ज्यूस, ग्लुकोज डी, चॉकलेटस,फळे ,पाण्याच्या बाटल्या इतक समान सोबत घेतले.  लोंढा ते कॅस्सेल रॉक हा रस्ता खूप छान आहे. उंच डोंगरावर उतरलेले दूर ढग आणि त्यातच काही लहान मोठे वाहणारे धबधबे लक्ष वेधून घेत होते. इतका सगळं छान असूनही रात्री पाहिलेला पिवळा बोर्ड कधी येईल असा झाल होत. पाहता पाहता कॅस्सेल रॉक स्टेशन वर आम्ही पोह्चलो. बरीच गर्दी दिसतही होती. सगळे निसर्गप्रेमी अगदी उत्साही दिसत होते. स्टेशनच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या जागेत आम्ही गाडी पार्क केली आणि रेल्वे च्या पटरीवर पाऊल ठेवले.
"कॅस्सेल रॉक" रेल्वे स्टेशन
कॅस्सेल रॉक ते दुधसागर हे अंतर साधारण १३ -१५ किलोमीटर आहे . . दुधसागरला पोहचण्यासाठी तसे अनेक पर्याय आहेत. एक म्हणजे लोंढा रेल्वे स्टेशनवरून  रेल्वेने प्रवास करावा आणि अवघ्या २० मिनिटांमध्ये दूधसागरला पोहचावे.  (पण यात काही मज्जा नाही).किंवा रमत गमत रेल्वे ट्रेक पादाक्रांत करावा ज्याला ५-६ तास लागतात.आम्ही देवाच नाव घेऊन चालतच  हा प्रवास सकाळी ९ वाजता सुरु केला.
अत्यंत स्वछ आणि निसर्गरम्य असा हा कॅस्सेल रॉकचा परिसर. रस्त्यावर, डोंगरावर,सहज कोणही चालू शकत पण खडी  असलेल्या रेल्वे ट्रेक वर चालण आणि ते ही १३-१५ किलोमीटर हे जरा  कठीणच जात.(मला हे चालताना समाजल)  त्यामुळे दूधसागरला भेट देणार असाल तर योग्य कपडे, शूज(च), ५-६ तास पुरेल इतकं पाणी, ग्लुकोज डी, चॉकलेटस,फळे आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे इतक दूर चालण्याच मनोबल सोबत घेणे अत्यंत आवश्क्यक आहे. मित्रहो, पण निसर्गातील गारवा, मनातील उत्साह आणि जोश यामुळे १३-१४ किलोमीटरचे  अंतर देखील फारस अवघड वाटत नाही .

या प्रवासात आपल्यासारखे अनेक निसर्गप्रेमी दिसत असतात. ज्यांमध्ये फक्त तरुण वर्गच नाही तर लहान मुले ,वृद्ध देखील या आगळ्या वेगळ्या (ट्रेक ) प्रवासाचा आनंद लुटत असतात. खाली उतरत असणारे पांढरे शुभ्र ढग, दोनही बाजूंना असणारी हिरवळ, लहान मोठी फुलझाडे आणि रेल्वेचा चकाकणारा रूळ अस काहीस वातावरण आपण या  ५ तासच्या सबंध प्रवासात अनुभवत असतो. आम्ही या संपूर्ण प्रवासात उन आणि पावसाचा लपंडाव देखील अनुभवला, पावसाने चिंब कराव आणि उन्हाने वाळवाव असे हे चक्र शेवटपर्यंत चालूच होत.
सुरवातीच्या काही तासांनंतर खरी मज्जा चालू होते . रेल्वे ट्रकच्या डाव्या बाजूला असणार्या डोंगरांगा आणि त्यात वाहत असणारे स्वच्छ पाण्याचे झरे मन मोहून घेतात. या झर्याच्या जवळ थोडावेळ विसावा घेऊन पुन्हा मार्गस्थ झालो.जाताना वाटेत अनेक हौशी फोटोग्राफरही दिसत होते. अगदी रेल्वे च्या रुळांचे उभे आडवे ,आगळे -वेगळे फोटो ते घेत होते. त्यांना नक्कीच त्यात काहीस छान दिसत असावं हे नक्कीच. ते म्हणतात न कि  प्रत्येक गोष्टीत आपल वेगळच  अस एक सौदर्य असत फक्त शोधणार्याला च  ते दिसत.

रुळांवरून चालत पुढे जात असताना आपल्याला आजही मजबूत आणि भक्कम आहेत. असे हे इतिहासाचे साक्षीदार आपल्या स्वागताला सज्ज आहेत असच वाटत.साधारण ३-४ तास चालल्यानंतर आम्हाला  करण्जोल नावाच स्टेशन लागले
ब्रिटीश काळातील उत्तम अश्या स्थापत्य कलेचे नमुने असणारे बोगदे
 

 इथून अगदी १ तासाच्या अंतरावरच  दुधसागर आहे असे जेव्हा आम्हाला समजला तेव्हा "अजून १ तास !! अरे बापरे !! अशी माझी प्रतिक्रिया झाली. खाऊन, पिऊन आम्ही काही वेळ इथेच विश्नाती घेतली. विश्रांतीनंतर दमलेल्या शरीरात जरा जोश आला.  आम्ही इतके दमलो होतो कि फळांनी, खाऊनि भरलेली गच्च बग्स कधी रिकामी झाली हे समाजलच नाही .आता मात्र कधी एकदा दुधसागरचे दर्शन होतंय अस वाटायला लागल होत.येणाऱ्या -जाणार्या रेल्वे गाड्या पाहून  आणखीनच मज्जा वाटत होती. कारण काही तरुण मुल स्वतःला गुलाम पिच्चर मधील आमिर खान समजून धावत्या गाडीसोबाताचे फोटो घेण्यात रमलेली होती.वाटेत भेटणारे आणि परत मार्गी जाणारे सगळेच लोक दुधसागरचे वर्णन करत होकरत होती. जवळच आहे, अजून १५-२० मिनिटच अंतर राहिल अस देखील सांगत होती आणि आमच्या सारख्या दमलेल्या लोकांची उमेद वाढवत होती. अनोळखी लोक असतात हि सगळी  पण त्यांच्याशी बोलून, त्यांचे अनुभव ऐकून  छान वाटत होत. वाटेवर आम्हाला  पाण्याचा एक मोठा प्रवाह लागला . त्या पाण्यात आम्ही उतरलो आणि मनसोक्त खेळलो. तो प्रवाह प्रचंड मोठा होता जणू दुधसागराचा लहान भाऊच! त्यावरून आम्ही उगाच आपल दुधसागर च्या आकारमानाबद्दल नको ते अंदाज बांधत होतो .सुंदर अशा या निसर्गरम्य वातावरणात चालताना एक गोष्ट लक्षात येते कि, निसर्गापेक्षा सुंदर अस या जगात काही असूच शकत नाही.तुम्हीही जा, भेट द्या म्हणजे तुमची ही  खात्री पटेल.

लोकांनी सांगितल्याप्रमाणे साधरण ३० मिनिटात आम्ही "दुधसागर स्टेशनवर" पोहचलो. पण  दुधसागर अजून पुढे १५ मिनिटे दूरच आहे हे ऐकल्यावर मात्र "काय हे???" असे वाटले आणि पुढची १५ मिनिटे सुद्धा खूपच  वाटायला लागली. आम्ही जस जस पुढे जाऊ लागलो तस तसे या विशाल धबधब्याची  झलक दिसायला सुरुवात झाली होती . त्याचप्रमाणे त्याच्या कोसळणाऱ्या पाण्याचा आवाजही  कानावर पडायला लागला.   त्यानंतर तर मी मात्र स्वतःला थांबवूच शकले नाही. आम्ही अजून जोरात चालू म्हणजे जवळ जवळ पळतच पुढे जाऊ लागलो. सुरुवातीला आधी काहीशी चालणाऱ्यां लोकांची तुरळक गर्दी पाहून वाटल होत की इथे फारच कमी लोक येत असावेत. मात्र जस जसे आम्ही जवळ पोहचत होतो त्याचप्रमाणात  ही गर्दी वाढत होती. दमलेले, थकलेले पर्यटक रेल्वेच्या रुळावर पाय पसरून मस्त आराम करत येणार्यांचे स्वागत करत होते. या ठिकाणी असणार्या लहान दुकानात तुमच्या पोट्यापाण्याची आणि चहाची सोय होऊन जाते. दुधसागरचे दर्शन घ्यायचे होते त्यामुळे या  ठिकाणी न थांबताच  आम्ही पुढेच चालत राहीलो .

शेवटी एकदाची ती उत्कंठा संपली आणि पाण्याचा तो सागर डोळ्यासमोर अवतरला !!! त्याचे हे  विशाल रूप पाहून आपण कोण आहोत, किती चालून आलो आहोत ,कसे आलो आहोत , कुठून आलो आहोत या सर्व सर्व गोष्टींचा  मला विसर पडला.  डोंगराच्या माथ्यावरून  पडणारे हे प्रचंड पाण्याचे लोट जणूकाही आकाशातातूनच पडत आहेत असाच भास मला तरी होत होता.
गरमागरम चहा आणि वडापावचा मस्त आस्वाद घेत मी  दुधसागर डोळ्यात सामाऊन घेतला आणि मनोमन निसर्गाच्या या आगळ्यावेगळ्या चमत्काराला नतमस्तक ही केल.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: दुधसागर ! अद्भुत अनुभव !!

prathamesh mayekar
mast