
शाळेत मला जायचं होत
मला ही शिक्षण करायचं होत
जन्म माझा झाला कचराकुंडीत
दिनरात फिरतो मी उखरडे धुंडीत
रोज रोज शाळेत जाणारी मुल मी बघतो
काय पाप केलं असेल मी जे हे असले भोग भोगतो
मायबाप माझे मला गेले असे एकटा सोडून
स्वप्न बघू तरी कोणते आता झोप गेली माझी उडून
शाळेत जाव विचार मनात येतो माझ्या
मास्तरने विचारलं तर नाव काय सांगू बापाचे माझ्या
म्हणून फक्त दुर उभे राहून शाळेत येनारी जाणारी मुले मी बघतो
आडोशाला उभे राहून मन भरून रडून माझ्या नशिबाचे भोग मी भोगतो....
माझ्या नशिबाचे भोग मी भोगतो....
काव्यरचना- सागर महाडिक