आईचे प्रेम तरी कितवे आहे ?

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आईचे प्रेम तरी कितवे आहे ?

Sagar Mahadikअरे अरे देवा हिला इतके रूपवान का केले,
गल्लीतल्या सर्व पोरांना तिने घायाळ केले...
प्रेम कुणावर करते कळत नाही आम्हास,
ती माझीचं व्हावी हाचं पोरांचा एक ध्यास...
फेसबुक वर आहेत तिचे हजारो मित्र,
ती कोणाशीच बोलत नाही म्हणून,
तिला विचारात सुद्धा नाही गल्लीतल कुत्र...
एका मुलाने हिंमतीने दिले तिला एक प्रेमपत्र,
तिने हाती घेतले सर्व त्याच्या जीवनाचे सूत्र...
प्रेम करतो तो तिच्यावर,
पण तिचे प्रेम नसे याच्यावर...
हा दिवस रात्र भटकतो तिच्यासाठी,
एकक्षण वेळ सुद्धा देत नाही आईसाठी...
काय तिच्यावर केलेले हेच त्याचे पहिले प्रेम आहे
मग आईने त्याच्यावर जे प्रेम केले
ते प्रेम तरी कितवे आहे...
ते प्रेम तरी कितवे आहे ?
- सागर :)