मी त्यांना रडतांना बघितलंय...!!!

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

मी त्यांना रडतांना बघितलंय...!!!

Sagar Mahadik


हिंदुस्थानच्या मातेच्या कपाळावरच कुंकू ज्या शिवरायांनी अबाधित ठेवलं त्याचं शिवरायांच आत्मलिंग म्हणून महाराष्ट्रभर ताठ मानेने उभे असलेल्या गडकोटांना मी आज माझ्या डोळ्यांनी रडतांना बघितलंय...कुठ गेला स्वाभिमान..अनं कुठ गेला तो स्वराज्याच्या गवताच्या पात्याबद्दलचा असलेला अभिमान...अरे बस करा हि असली फालतूगिरी...”मोडेन पण वाकणार नाही” म्हणे. अरे तुमचे हे असले रुबाबदार आणि रक्त पेटवून उठवणारे काव्य त्या गडकोटांनि एकले तर त्यांना सुद्धा यावर हसू येत.काय तर म्हणे “पुरे झाले तुमचे आता स्वराज्यावरील हल्ले बुरुजासकट जागे करू स्वराज्यातील गडकोट अनं किल्ले”.सुरवात कुठून करणार ते सांगा आधी.आणि त्यांना जागे करायची गरज नाही विशेषतः त्यांना जागे करायची तुमची लायकीचं नाही.अरे त्या गड्कील्ल्यांना झोपवण्यासाठी चांगले चांगले आले आणि गेले..परंतु ते आजहि त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगत जागीचं आहे.त्यांना अजून तुम्ही काय जागी करणार तुम्हाला जर जागीचं करायचं असेल ना तर तुमच्या हृदयात झोपलेल्या त्या मावळ्याला जागी करा ज्या मावळ्यांनी स्वतःच आयुष्य पानाला लावून शिवरायांच्या स्वराज्यातील सह्याद्रीच्या संपत्तीचं रक्षण केल.एकदा प्रतापगडला भेट दिली होती.गडाच्या जवळ गेलो तेव्हा सर्वात प्रथम नजरेस पडला तो म्हणजे “भगवाध्वज” स्वराज्याच निशाण..”भगवा ध्वज नजरेस पडताच डोळे मिटले आणि अंतकरानातून त्याला मुजरा केला.त्याचे आभार मानले कारण आज शिरावर भगवा आहे म्हणून कोणी परक्याची उरावर बसायची हिंमत होत नाही.थोड पुढे गेलो तर नजर गेली ती त्या अफजल्याच्या थडग्या कडे, ज्याच्या दिवाबत्तीची सोय शिवरायांचा आज्ञा म्हणून आजही भवानी मातेच्या मंदिरातून केली जाते.वाईट मला त्या गोष्टीच नाही वाटलं पण वाईट या गोष्टीच वाटल कि आज या महाराष्ट्रभर बरेच जन बोंबलत हिंडत आहे कि थडग पाडा..थडग पाडा, का तर ते किल्ल्यापेक्षा अतिसुंदररित्या बांधलं जात आहे म्हणून परंतु मी म्हणतो ते पडायचं तेव्हा आपण पाडूच परंतु जरा किल्ल्या कडे पण लक्ष द्या.त्याची अवस्था काय झाली याचा पण विचार करा..ते अफजल्याचं थडग आपल्याला सांगत आहे कि बघ माझी वट, कशी डागडूगी केली जाते माझ्या थडग्याची. पण तुमच्या शिवबाच्या किल्ल्याचं काय ? आणि त्याच्या अश्या बोलण्याचं मला जास्त वाईट वाटत आहे.पुढे प्रवेशद्वारा जवळ गेलो किल्ल्यामध्ये प्रवेश करतांना हृदयावर हात ठेवून डोळे मिटून “जय शिवराय” अस स्मरण केलं, तर तिथे मी काही टोळ ची टोळ बघितली ती मावळ्यांची नाही हो..तर कावळ्यांची” असंच म्हणाव लागेल.कारण त्यांचं वागण बघून त्यांना कावळ्याची उपमा द्यावी अस मला वाटलं. कावळा नाही का जिथे खातो तिथेच घाण करतो तसली ती सर्व कार्टी होती. त्यांची तोंड चालूच होती वेफर्स खा..केळी खा..आणि अजून इतर काही खाद्यपदार्थ खात होती आणि गडावर गळ्यातगळे टाकून फेरफटका मारत होती.त्यात त्यांनी खाल्लेलं उष्ट किंवा त्या वेफर्स किंवा इतर पदार्थांच्या पिशव्या ते चालतांना हातातून सहज गडावरचं खाली टाकत होती.पाण्याच्या बाटल्या तर ते खाली झाली कि गडावरून खाली भिरकावत होते.मी म्हटलं शिवराया काय हे..जिथे तलवारींचा खनखनांट झाला त्याच ठिकाणी हि घुंगरू बांधून फिरणारी अवलाद कुणाची. शिवराया या गडाला हे असे कसले दिवस बघावे लागत आहे. असा विचार करत असतांनाच एक शिवभक्त तिथे आला आणि त्याने सरळ त्या टोळी मधील एकाची कॉलर धरली.मग काय ? ते बॉलीवूड चे हिरो नं लगेच त्यांनी त्या शिवभक्ताला घेरलं मी बघत होतो. तो सर्व प्रकार तितक्यात माझ्या मनात आलं कि चला आपण त्याला साथ देऊ. पण लगेच मनात आलं म्हटलं वाघाला कळपात शिकार करायला जास्त आवडते आणि आपण जर तिथे गेलो तर मग आपल्यात आणि त्या कुत्र्यांमध्ये फरक तरी काय ? तेव्हा त्या शिवभक्त वाघाला एकट्याला सामना करू द्या हि वेफर्स आणि लॉलीपॉप खाऊन मोठी झालेली कार्टी त्याच काही वाकड करू शकणार नाही.आणि मग काय त्यांच्यातील एकाने विचारलं काय..रे..काय झालं का कॉलर पकडली याची तर तो बोलला “गड काय तुमच्या बापाचा हायं कारं जे इथं घाण करू राहिले..” तेव्हा त्यातील एक त्याला बोलला तू कोण रे..हा गड आमचा नाही कि आमच्या बापाचा पण नाही मग हा गड काय तुझ्या बापाचा आहे का ? जे तू इतका जोर दाखवत आहे इथे..मी तो सर्व प्रकार बघत होतो.तेव्हा तो बोलला हो हा गड माझ्या बापाचा आहे ज्याने त्याच संपूर्ण आयुष्य या गड्कील्ल्यांवरती प्रेम करत घालवलं. तुम्हा लोकांना १९ फेब्रुवारी आणि काहींना तिथीच्याचं दिवशी ज्यांची आठवण येते ना अश्या शिवरायांचा हा गड आहे कळल का ? आणि मी त्यांचाच पुत्र आहे “प्रताप” नाव माझं.त्यामुळे तुम्ही हि तुमची असली घाणेरडी कारस्थान थांबवा नाहीतर तुम्हाला याच गडावरून खाली फेकीनं.तेव्हा त्यातील एकाने त्या “प्रताप” ला म्हणजे त्या शिवभक्ताला हटकलं आणि म्हणाला जा रे तू इथून आम्हाला नको धमकी देऊ.आणि इथे कचरा करणारे आम्हीच नाही काही ते बघ ते सर्व किती कचरा करत आहे.आणि तो बघ साला..कुठे मुत्रविसर्जन करत आहे त्यांना अडव आधी.काळजी नका करू त्या मुत्रविसर्जन करणाऱ्याच्या कंबरात मी आधीच लाथ घातली आणि त्याला तिथून पळवलं आणि हे त्या प्रताप ने बघितलं आणि त्याने नजरेतून आभार व्यक्त केले. मग मी त्याच्या जवळ गेलो आणि त्या मुलांना सांगितलं कि प्रताप एकटा नाही त्यामुळे तुम्ही टाकलेला हा कचरा तुम्ही आता उचलायचा कळलं नाहीतर नागड करू आम्ही. मग काय त्या मुलांनी क्षमा मागितली आणि त्यांनी तेथील थोडा का होईना कचरा साफ केला.प्रताप ने माझे आभार मानले आणि तो जायला निघाला मी त्याला थांबवल आणि विचारलं प्रताप कुठ निघालास तू तेव्हा तो म्हणाला माझे जिवलग माझी वाट बघत असतील मला तिथे जायला हवं मी म्हणालो मी पण येऊ का तुझ्या सोबत तर तो म्हणाला तिथे तुला नेता येणार नाही.मी म्हटलं का तर तो बोलला ते मी नाही सांगू शकत पण जर तुला यायचंच असेलं तर मी सांगेल तास तुला कराव लागेल. मी विचार केला कि यार..जर हा प्रताप शिवभक्त आहे तर मग याचे मित्र सुद्धा शिवभक्त असतील तितकीच आपली भेट होईल.मग मी त्याला होकार दिला कि चालेल तू सांगशील तास मी करायला तयार आहे मग काय प्रताप मला त्याच्या सोबत घेवून गेला तो थेट त्या भगव्या ध्वजाच्या जवळ आणि मला म्हणाला चल आता आपल्याला येथून खाली उडी मारायची आहे.मी म्हटलं मित्रा कसली मस्करी करत आहेस तू..इथून उडी मारली तर मरेल ना मी.तर तो म्हणाला अरे नाही मरणार तू..आणि तू मरणाला कधीपासून घाबरायला लागलास.विश्वास ठेव माझ्यावर आणि मार उडी.प्रताप ने माझा हात त्याच्या हातात घेतला आणि मला डोळे मिटायला सांगितले आणि त्याने व मी आम्ही दोघांनी गडावरून खाली उडी मारली...मी प्रताप ला बोललो प्रताप मला काहीच का दिसत नाही रे...तेव्हा प्रताप मला म्हणाला डोळे उघड त्याच्या सांगण्याप्रमाणे मी डोळे उघडले.तर बघतो तर काय मित्रांनो..माझ्या समोर ती कार्टी मुल बसलेली होती.मला वाटल माझा गेम झाला आता काहीतरी.फसलो मी आता इथे आजूबाजूला बघितलं तर ती जागा एका राजवाड्या सारखी मला भासत होती म्हटलं हे काय भानगड आहे.तेव्हा प्रताप मला म्हणाला घाबरू नकोस मित्रा..मी तुला यांची खरी ओळख करून देतो.हा आहे “शिवनेरी”..ज्याने शिवरायांच बालपण बघितलं.. हा आहे “पुरंदर” ज्याने शिवरायांची चतुराई बघितली...आहे आहे “विशाळ’गड”..ज्याने शिवरायांना संरक्षण दिलं...हा आहे “सिंह’गड”....ज्याचे नाव मावळ्याला स्मरून महाराजांनी ठेवलं.आणि मी “प्रताप’गड”...मी महाराजांचा प्रताप बघितला..आणि आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ना तर हा आहे रायगड...जो महाराजांचा प्राण आहे.माझ तर डोकच बंद पडल म्हटलं हा सर्व काय प्रकार आहे..मी त्या सहाही गडांसमोर नतमस्तक झालो आणि मला माफ करा मला मारू नका मी काहीच केलेलं नाही अशी विनवणी करू लागलो.नंतर मी त्यांना एक प्रश्न केला तुम्ही सर्व त्या ठिकाणी कचरा करत होतात..तुम्हाला बघून हा प्रताप तिथे येतो तुम्हाला धमकी देतो आणि तुम्ही परत कचरा साफ करतात आणि आता लगेच मला तेथून उचलून काय आणतात आणि इथे परत अशी गड्कील्यांची नाव सांगून मला वेड काय बनवतात हा सर्व काय प्रकार आहे. मला सांगाल का ?तेव्हा प्रताप बोलला आम्ही शिवरायांचे “गडकिल्ले” आहोत. आणि तुला या ठिकाणी यासाठी आणलं कारण तू एक असा मनुष्य आम्हाला भेटला कि जो आमची व्यथा जाणून घेईल आणि आमच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी काहीतरी प्रयत्न करशील.आणि आमची काही रूप नाही रंग नाही म्हणून आम्ही हि रूप घेतली आहे तू त्याकडे लक्ष नको देवू. मी म्हणालो ठीक आहे पण मी काय करू शकतो.तेव्हा शिवनेरी म्हणाला शिवरायांच्या मावळ्यांना कधी हा असला प्रश्न पडला नव्हता त्यांना फक्त आज्ञा माहिती होती.तेव्हा मी म्हणालो मी तुमची मदत करेल परंतु तुम्हाला काय मदत करायची मी..तुमचा प्रोब्लेम काय आहे ते तरी सांगा मला तेव्हा प्रत्येक जन आप आपले प्रश्न माझ्यासमोर मांडू लागला.प्रतापगड: माझ्या समोर महाराजांनी त्या नरराक्षस अफजल्याला फाडला पुन्हा कोणी स्वराज्याकडे वाईट नजर करून बघू नये म्हणून त्याला माझ्या पायथ्याशी गाडला परंतु आता त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे.याला कोणी अटकाव करत नाही आहे.तसेच दुकानांचे अतिक्रमण सुद्धा खूप वाढल आहे रे..त्यामुळे कुडाकचरा सुद्धा वाढला आहे.एक शिवकाळ होता जिथे शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमाने शत्रूंच्या रक्ताने माझा अभिषेक होत होता परंतु आता बघितलं तर कचऱ्याने माझा अभिषेक घातला जात आहे.इतकाच नाही तर आता मी खूप थकलो आहे.माझ शरीरात आता हे असले धक्के सहन करण्याची ताकद राहिलेली नाही.माझी पडझड होत आहे.कदाचित मला वाटत भविष्यात मी फक्त नामशेष राहील नाहीतर त्या अफजल्याच्या नावाने माझी ओळख राहील अस मला वाटत आहे.आणि हे बोलतांना प्रतापच्या डोळ्यात पाणी आलं.नंतर सिंहगड बोलू लागला..माझी सुद्धा हीच हालत झालेली आहे. ज्या तानाजीने स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून मला स्वराज्याचे तोरण बांधले आज त्याच ठिकाणी लाजलज्जा सोडून लग्नाचे स्वप्न काही कारटी रंगवतांना दिसत आहे.नको तसली लज्जास्पद कृत्य ते करत आहे.तलवारींचा खणखनाट तर नाही पण बाटल्यांचा आवाज मात्र तिथे बिनधास्त पाने घुमत आहे.आणि राजरोज पार्ट्या केल्या जात आहे.आणि सिंहगडला सुद्धा रडू आलं...विशाळगड बोलू लागला मला तर आज प्रश्न पडला आहे कि मी स्वराज्याचा आहे कि गनिमांचा..आज तिथे काही लोक वस्ती करून रहात आहे आणि त्यांचे जीवन त्या ठिकाणी घालवत आहे.मग काय वस्ती आली म्हणजे बाकी सर्व क्रिया आलीच कि..आणि विशाळ सुद्धा त्याचे अश्रू थांबवू शकला नाही...शिवनेरी पण बोलला मी पण हेच असले भोग भोगत आहे.धन्यता मानतो शिवरायांचा जन्म मी बघितला म्हणून वर्षाने का होईना माझा विचार हे लोक करतात..पण त्या एका दिवसा नंतर सर्व काही जैसे थे..पुरंदर तर म्हणाला माझी तर आता पडझड होत आहे मी पण शेवटच्या घटका मोजत आहे..आणि हे सर्व सांगून झाल्या नंतर त्या सर्वांनी मला एकाच सांगितलं कि,महाराज सुद्धा तुम्हा सर्वांवर नाराज आहे.कारण महाराजांचा श्वास..प्राण..अस्मिता..इतिहास ! हा सर्व आमच्यावर अवलंबून आहे.महाराजांनी आम्हाला तळहाताच्या फोड प्रमाणे जपलं आमचा सांभाळ केला.परंतु तुम्ही महाराजांना राग येईल असे काम करत आहात याचे महाराजांना खूप दुखं होत आहे.कदाचित लवकरच महाराज या स्वराज्याला भेट देणार आहेतचं..तेव्हा आता आम्ही जातो.तुला हे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत तेव्हा ते कसे सोडवायचे ते तू बघ..आणि सर्वत्र धूर पसरला व मी भानावर आलो मिटलेले डोळे उघडले तेव्हा मी प्रतापगडाच्या प्रवेश द्वाराजवळचं होतो त्या भगव्या कडे बघू लागलो… ते सर्व दिसेनासे झाले त्यांची हि सर्व व्यथा एकूण माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं..काय हीचं का ती धुरंधर,बळकट,कठोर..ज्या ठिकाणी त्यांच्या अंगा खांद्यावर खेळायची हिंमत म्हटलं तर फक्त पाणी आणि वाराच करू शकतो असे ते ..त्यांच्या कडे बघून चांगल्या चांगल्यांना घाम फुटायचा अशी हि परमप्रतापी सामर्थ्यवंत गडवाट आज मला रडतांना दिसली. जर आज त्यांची हि अशी दैनं अवस्था आहे तर मग कसली शिवजयंती आणि कसला जयघोष करता शिवरायांचा..अहो खरे शिवराय तुम्हाला कळलेच नाही.अरे ज्या इंद्रदेवालाही यांचा हेवा वाटावा अस हे स्वराज्याचे देखने आधारस्थंभ आज ढासळले जात आहे...नामशेष होतांना दिसत आहे.परंतु आपण काय करत आहोत फक्त एन्जोय..हिंडायचं..फिरायचं..पार्ट्या करायच्या त्यांच्यावर कचरा करायचा..कोणी तर त्यांच्या आडून अश्शिल चाळे सुद्धा करतांना दिसत आहे. हरामखोर साले! ते गडकिल्ले जसे त्यांच्या बापाने बांधले आहे म्हणून काही त्यावर त्यांची नावे सुद्धा टाकायला मागेपुढे बघत नाही.रोडरोमियोची अवलाद कुठली.संताप होतो आहे.काय कराव कुठून सुरवात करावी काहीच कळत नाही.सर्वच जन पापी वृत्तीची आहे अस नाही.काही लोक शिवकार्य म्हणून त्यांचे संवर्धन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेतचं परंतु त्यांना येथील हे लबाडांच सरकार पाठ्पुरोवढा करत नाही आहे.मागे तर आलं होत कि गडांवरील भगवे ध्वज खाली उतरावा..अरे हराम खोरांनो आता तर तुमचे कपडेच उतरवून तुम्हाला चाबकाने चांगले फोडले पाहिजे.कुठ फेडणार रे हि पाप.शिवबा किती लिहायचं आणि किती हे समजवायचं यांना… इथे हे यांच्याच आयाबहिणींचं रक्षण करू शकत नाही ते या स्वराज्याच्या आणि शिवरायांच्या अस्मितेच काय रक्षण करतील..
---------
मित्रांनो इतिहास कागदाच्या पानावर नाही तर या मातृभूमीच्या हृदयावर जिवंत ठेवा..तरच त्याची खरी किंमत आपल्याला कळेल..म्हणून गड वाचवा तरच इतिहास वाचेल..!!!
--------------------------------------------

 - सागर महाडिक(शाब्दिक वादळ )