पाऊस सोहळा

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

पाऊस सोहळा

अनिल सा.राऊत
::::::::: पाऊस सोहळा ::::::: गूज पक्षांची कानी पाय रानात रुतला सूर कोकिळा प्याली कंठ झाडाला फुटला गाज वाऱ्याची पानी झुला खोप्याचा झुलला माय दिसता क्षणी बंध चोचीचा खुलला साज फुलांचा रानी गंध मातीला सुटला जीव लावूनि त्यासी रस भ्रमरे लुटला गातो ओहोळ गाणी रंग मोरांनी भरला नभ वाकता खाली ठेका सरींनी धरला भासे बिल्लोरी पाणी सूर्य तळ्यात दंगतो असा सोहळा भारी नित्य नव्याने रंगतो! ©अनिल सा. राऊत 9890884228 anandiprabhudas@gmail.com