दिपस्तंभ

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

दिपस्तंभ

Upendra Bajikar
दिपस्तंभ
कशासाठी जगायचं ?
 या प्रश्नाचं उत्तर तू कृतीमधून दिलंस …
शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी झिजून
मृत्यूलाही जिंकलस ….

देशभावना असणाऱ्या मनांमध्ये ,जात-धर्माची भिंत नसते
अन प्रगतीचे स्वप्न पाहणाऱ्या डोळ्यांत कधी संकटांची खंत नसते ….
असे जगण्याच्या ऊर्मीचे धडे तूच शिकवून गेलास
हरवलेल्या आदर्शांच्या जगात, तूच एक दीपस्तंभ ठरलास

तू दिलीस म्हणून आम्हा
धर्मनिरपेक्षतेची व्याख्या आज कळली
फक्त सत्तेपुरता धर्म वापरणाऱ्यांची बेगडी
झूल होती आम्हीही पांघरली

आपल्यासारखा दुसरा कुणी होऊ नये म्हणून
धडपडणाऱ्यांच्या गर्दीत तुझं वेगळेपण ठसणारं होतं
विचारधारेच्या क्षेपणास्त्र निर्मितीचं
सामर्थ्य फक्त तुझ्या ठायी होतं


तू अब्दुल्ला होतास की आणखी कुणी मसीहा होतास ?
आम्हासाठी प्रेरणेचा एक स्त्रोत होतास…
तुझ्या विचारांचं बीज आज हजारो मनांमध्ये पेरलं आहे
म्हणूनच महासत्तेचं एक स्वप्न देशामध्ये अंकुरलं आहे

तुझ्या जाण्यानंतर त्या स्वप्नांचा
जयकार पुन्हा निघाला आहे
ते स्वप्न पाहण्याचं बळ देणारा,
एक अग्निपंख आज निमाला आहे
                 - उपेंद्र बाजीकर udbajikar@gmail.com