स्वतंत्रतेची शपथ तुला गं!...............

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

स्वतंत्रतेची शपथ तुला गं!...............

Santosh Rane
स्वतंत्रतेची शपथ तुला गं!...............


मी सृष्टी आड
तुझ्या दृष्टी आड
लपले तुझिया उदरी
क्षणात चाहूल माझी लागता
ठरले का मी उपरी?

तूच माता, तू भगिनी
झालीस तू सहचारिणी
आता कसे हृदय तुझे गं!
घडले तख्त अन पाषाणी
खुपसशी सुरा तू
आज माझ्याच का उरी
क्षणात चाहूल माझी लागता
ठरले का मी उपरी

सजवू दे मज घर अंगण
तूज जवळी माझ्या रक्षेचे बंधन
गर्भाशयाची सीमा तुला गं!
केली परमात्म्याने अर्पण
ओवाळणी माझ्या जीवनाची तुला
तू कर आज अनोखे रक्षाबंधन
बांध रेशमी गाठ तूच गं!
नाळेची ती ममत्व दोरी
वचन देते तुजला मी
ठरणार नाही गं मी कधीच उपरी

भारत मातेची तुटून शृंखला
बघ ती ही स्वातंत्र्य झाली
जगू दे मजही  स्वतंत्रतेने
वाट पहाते तुझी तान्हुली
टाक उसासे ममतेचे तू..............
तूच भरशील तुझीच झोळी
फडकला तिरंगा स्वतंत्रतेचा
बलिदानाची खेचता दोरी
जगविण्यास स्त्री-जन्मा
तुझ्याच हाती पाळण्याची दोरी
तुझी साथ असता मला
कोण करील मजला उपरी

घाबरू नकोस जगास आंधळ्या
शिळा तुझी जरी अहल्येपरी
स्वतंत्र करशील मज जरी तू
परमात्मा करील तूज पवित्र नारी
बनू नकोस स्वतः आंधळी
कुरूक्षेत्रा मधील तू गांधारी
महाभारत पुन्हा नको ते
नको पुन्हा वासना विषारी
स्वतंत्रतेची शपथ तुला गं!
करू नको मज तू उपरी


संतोष कृष्णा राणे
सांताक्रूझ (पूर्व)
९२२४३१६३१०
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: स्वतंत्रतेची शपथ तुला गं!...............

Nagesh
अप्रतीम !!!