मनाची प्रगती

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

मनाची प्रगती

डॉ.मानसी नाईक
मनाची प्रगती.
मनाची प्रगती करायची हे तर निश्चित झालंय.
पण मनाची प्रगती झालीय हे कळणार कसं?
इथे पेपर नाही आणि मार्क नाहीत.....
पण काही खुणा जरूर आहेत.
एकक म्हणाल तर मनात घडणारा बदल.मन हे सर्वव्यापी आहे.त्यामुळे बदल वेगवेगळ्या स्तरावर दिसून येतात.
=व्यावहारिक बदल.....वागण्यात सकारात्मक बदल,निर्णय क्षमता वाढणे,अचूक शब्दांचा वापर,आवश्यक तिथे मौन,एक प्रकारचा द्रष्टेपणा येणे.
=भावनिक बदल......नात्यांचे मर्म समजणे,कुठला माणूस आणि त्याचं मनातलं स्थान काय हे ठरवता येणे,अवास्तव महत्व देणे वा योग्य त्याला महत्व टाळणे हे प्रकार बंद होतात.
=मनाचे अंतरंग.......मनाची शक्ती वाढते,विचारांची दिशा बदलते,आपण प्रगती करावी ही प्रेरणा मनाच्या आतून येते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.ते unit आहे मनाची प्रगती मोजण्याचं.
=परस्पर संबंध.......jigsaw कोडं सोडवावं तसं सगळ्या गोष्टी आपापल्या जागी जाऊन बसतात.
नाती टिकवण्यासाठी,तुटल्यावर दुरुस्त करण्यासाठी जे काही लागतं ते आपोआप मनात येतं.ही अनुभवायची गोष्ट आहे.
=आध्यात्मिक बदल.......मनाची प्रगती झाली की मनाची शक्ती वाढते.भविष्यकाळाचा अंदाज येणे,समोरचा माणूस काहीही बोलत असला तरी त्याचं मन साधारण वाचता येणे,मनात काही विचार जे मनाला खाली खेचतात ते कायमचे कमी होणे,कालांतराने पूर्ण जाणे.
=मेंदूतला बदल......अल्फा नावाच्या लहरी मेंदू तयार करतो.तेव्हा तो स्वस्थचित्त असतो आणि उत्तम काम करतो.बुद्धीची सगळी कामं ठीक ठाक चालू असतात.इतकंच नव्हे तर मनाच्या प्रगतीत सातत्य ठेवलं तर उजवा मेंदू जास्तीत जास्त काम करतो.
मनाची ही शक्ती म्हणजे गूढ प्रवास आहे.
आपण जन्म घेतो ते मजा करायला तर घेतोच.
पण प्रगती करून घेणं हे प्रत्येक माणसाचं काम आहे.
रोज पंधरा मिनिटं फक्त.
मन लावून ध्यान केलं तरी हे मनाचं काम चालू होतं.
मग आपणच वाटू लागतं की यापुढे प्रगती करावी.
आपोआप मार्गदर्शन मिळत जातं.
प्रवास पुढे चालू रहातो.......
तमसो मा ज्योतिर्गमय .