सोबत

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

सोबत

डॉ.मानसी नाईक
"ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला.....
तळमळला.....सागरा....."
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली ही आर्त कविता.माहित नाही असा कोण माणूस असेल?मंगेशकर भावंडांच्या गंधर्व आवाजात ऐकताना ज्याचे डोळे ओलावत नाहीत तो माणूस कसा ?
का ओलावतात डोळे?का शहारा येतो?का हुरहूर वाटते?सगळे शब्द अर्थासकट समजतात,म्हणून?का अप्रतिम चालीतले स्वर कळतात,त्यातली स्वरयोजना चपखल आहे,हे कळते ....म्हणून?की त्या स्वर शब्द आवाजाच्या अप्रतिम कॉम्बिनेशन ची समीक्षा करता येते म्हणून?यापैकी काय असतं?
यापैकी काहीच नसतं.
शास्त्रीय दृष्ट्या मीमांसाच करायची झाली तर मेंदूमध्ये अल्फा तरंग निर्माण करण्याची क्षमता असलेली ही स्वररचना आहे.कुठल्याही स्पष्टीकरणा पलीकडे जाऊन ती मनातल्या आर्त भावनांना साद घालते,हे दुसरं संभाव्य कारण.पण आपल्याला या कवितेचं रसग्रहण नाही करायचं.एखाद्या सुंदर दिवशी आणि सकाळी ते आपण करूच,पण या निमित्ताने अशा गोष्टींची लिस्ट तयार करू.
अशी स्वतःपुरती लिस्ट........स्वतःच्या आवडीच्या छोट्या मोठ्या गोष्टींची लिस्ट.
ज्याने मन भरून येतं,डोळे पाणावतात,"सुखाने दुखवजीव "किंवा "दुक्खात सुखाचे क्षण आगळे "अशी अवर्णनीय अवस्था होते.ही लिस्ट म्हणजे आपली शिदोरी.हे आपले तहान लाडू,भूक लाडू.
पूर्वीच्या बायका म्हणत...."लांबच्या प्रवासाला निघाला आहेस.तहान लाडू,भूक लाडू जवळ ठेव."का,कारण प्रवासात स्वतःच्या तहानेची,भुकेची व्यवस्था स्वतःबरोबरच हवी.
तशी आयुष्यात ही लिस्ट नुसती लिस्ट ठेवून भागत नाही.त्याची जमवाजमव करावी लागते.आता गाण्यांचच घ्या.एक लिस्ट करा अशा गाण्यांची.मग ती सगळी गाणी एकत्र करा.mbl,नाहीतर आणखी कुठेही.ती वेगवेगळ्या मूड ची असतील,पण ती तुमची playlist असेल.
कुणाला सुंदर पत्र लिहित असाल,mail पाठवत असाल,तर ते स्कॅन करा,ड्राफ्ट करा,सेव्ह करा.लिहिताना मिळालेला सर्जानातला आनंद तुम्हाला पुन्हा पुन्हा भोगता येईल.
कुणाला गाता येत असेल तर ज्या दिवशी गळा "तापलेला "आहे,गाताना स्वतःवर खुश असाल तर ते रेकॉर्ड करून ठेवा.
आवडलेला पिक्चर डाऊनलोड करून ठेवा.
आवडलेलं पुस्तक चक्क विकत घ्या.किंवा त्यातले आवडलेले,तुमच्या हृदयाशी नातं सांगणारे उतारे एकत्रित करा.
आवडलेल्या matches पुन्हा पुन्हा बघा.
हा तुमचा खजिना कल्पनातीत काम करेल.तुम्हाला आश्वस्त करेल.परत अशा सृजनाची आणि शोधाची प्रेरणाही देईल.
मुख्य म्हणजे तुमची ताणाची,रुक्षपणाची आणि एककल्ली पणाची लेव्हल झटकन कमी करेल.
आणि ही गोष्ट अत्यावश्यक गरजांमध्ये मोडते.पुढच्या काळात प्रत्येक माणसाला याची जास्त जास्त गरज पडणार आहे.
आयुष्याचा वेग,यंत्र आणि असंख्य गोष्टींची सहज उपलब्धता माणसाला तृप्त करत नाही.सृजनता हरवते,आणि आनंदाचे आतले जिवंत झरे एक एक करून शेवटी बुडून जातात.जितकी गरज बाहेरच्या सोबतीची असते तितकीच गरज "आतल्या "सोबतीची पण असते.दोन्हीही तितक्याच महत्वाच्या असतात.
मनाला जर balanced ठेवायचं असेल तर दोन्ही सोबती मिळवाव्या लागतात आणि टिकवाव्या लागतात.शेवटपर्यंत.
तेरा साथ है तो......मुझे क्या कमी है
अंधेरोन्से भी मिल रही रोशनी है........