बालमजूर

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

बालमजूर

साजीद यासीन पठाण
आठ तासांच्या चक्रात बाबा
माझं बालपण हरवून गेलं,
अकाली प्रौढत्व दिलंत तुम्ही
माझं खेळायचं राहून गेलं ........!

दारिद्र्याचा बुजवण्या खड्डा
लहान भावाला संगती न्हेलं,
हुशारीची मलाच वाटली लाज
दप्तर फेकून हाती खोरं घेतलं ........!

यशाची माझ्या देऊन हमी
मास्तरांनी हुशारीचं दिलं दाखलं,
म्हणालात तुम्ही त्यानला
“ पोटी माझ्या चार मुलं - ...........

इतक्या मोठ्या दुनियेत मास्तर
माझं पोरगच का अडाणी ऐकलं,
शिकूनच का भाकरी मिळते
किती अडाणी उपाशी मेलं ........?

माझं हातपाय थकलं आता
करील बहिणींच हात पिवळं,
पर अपराधाची बोच मनी
कुस्करलं दारिद्र्यानं बालपण कोवळं ........!”

(मीच म्हणालो, त्यावेळी बाबा कि ........)
“ वाईट नका वाटून घेऊ
बाबा मला शिक्षण बास झालं,
बुद्धीमाधल्या खड्ड्यापेक्षा
पोटामधला डबरा खोलं........!!
पोटामधला डबरा खोलं ........!!

श्री. साजीद यासीन पठाण