चिमण्या

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

चिमण्या

पंढरीश चेके
चिमण्या चिवचिवतात
चार दाण्यांच्या चिवट असोशीत
कोण त्यांना समजावणार
पाव..पिझ्झा.. बर्गरचे
कधी कुठे सांडलेय शीत..?

इवलाल्या चोचीत काडी धरून
चिमण्या फिरतात बैठकभर
ऊशीरा उमगते त्यांना
देवादिकांच्या तसावीरीविना
सुखनैव जगतेय बकाल शहर

टी.व्ही. , पी. सी. , होम थियेटरवर
चिमण्यांना टेकता येत नाही बुड
मोकळ्याढाकळ्या लिव्हिंग रूममध्ये
का मिळू नये हक्काचा कोपरा
ह्याचे उलगडत नाही गूढ..

परीटघडीच्या परसात
चिमण्या फेरफटका मारतात
काहीच कसे नाही पसरायला पंख
म्हणताना हिरमुसल्या होतात
टिपू टिपू घेतायात चिमण्या
बाळाच्या चिमण्या ओठावरचे हसू
अबोध ; लाडीक मम्मा पप्पा
त्यात कुठाय रुपेरी आजी
शिताभाताच्या बोबड्या गप्प्पा

हल्ली चिमण्याशी फ़टकून शहर
जडशीळ पंख फिरतात माघारी
एकांताच्या आरशावर टोची मारत
टी. व्ही. मालिका भगव्या दुपारी

सांजवताना चिमण्या सैरभैर
माहेरपण हरवली अश्राप पोर
पिळवटलेले  काळीज घेवून
नभात उगवते  चंद्रकोर...
      ***