शाळा

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

शाळा

पंढरीश चेके
विकल मनाच्या पडवीमध्ये
घणघण घंटा भरते शाळा
वर्ग तासिका हस्तपुस्तिका
थकवी मास्तर खडू फळा

उंचाविती हात षडरीपू
त्यांना अवगत प्रश्न गहन
मागील बाकावर पेंगुळते
रोज न्याहाळतो द्रष्टे मन

रसाळ मोठे विषय विभ्रमी
गृहपाठाची कसरत पुरती
आखीव-रेखीव अक्षर ओळी
डाग शाईचे आत्म्यावरती

घोकून पाढे; प्रश्न- उत्तरे
का टक्क्यांचा चुकतो होरा
वाचाळाना वेळ पुरेना
अन मौनाचा पेपर कोरा..!

       *****