आयुष्य एक प्रवास….

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आयुष्य एक प्रवास….

Anamika
आयुष्य एक प्रवास….

निसर्ग भरभरून देत आहे...
थोडे ओंजळीत घेवून प्यायचे आहे..

गर्द रानावनात हिंडायचे आहे..
उनाड पावसात भिजायचे आहे..

डोंगर वाटा तुडवायाच्या आहेत..
खूप खूप भटकायचे आहे..

आयुष्याचा प्रवास साधायचा आहे…
प्रवासातल आयुष्य जगायचं आहे...


प्रवासातले प्रश्न सोडवायचे आहेत ..
प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत...

उत्तरांचा हिशोब मांडायचा आहे..
समाजाचं देण फेडायचं आहे..

जुन्या ज्ञानाचा विस्तार करायचा आहे..
नव्या ज्ञानाचा शोध घ्यायचा आहे...

हाक तुम्हाला देत आहे...
साद तुमची मागायची आहे..

माझ्यातले थोडे वाटायचे आहे...
तुमच्या कडचे थोडे मागायचे आहे..

तुमच्याशी मैत्री करायची आहे..
मैत्रीतली श्रीमंती गाठायची आहे..

तुम्हाला आनंद वाटायचा आहे..
तुमच्या सोबत मलाही तो लुटायचा आहे..

बेधुंद होवून स्वतःला हरवायचे आहे...
हरवून स्वतःलाच जिंकायचे आहे..

- निकिता कांबळे

Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आयुष्य एक प्रवास….

Vivek Vatve
Anamika,

Sundar Kavita. Avadli. Chhan aahe.

vrvatve@rediffmail.com
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आयुष्य एक प्रवास….

mahesh ghadge
In reply to this post by Anamika
nice