बस...

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

बस...

nilesh dattaram bamne
बस...
 
पहिलीला सोडताना
दुसरी लवकर भेटेल का ?
याचा विचार आपण
अगोदरच करायला हवा होता...
दुसरी भेटेपर्यंत
तिची ही वाठ पाह्णारे
आपल्यासारखे आणखी पाच-पन्नास
आपल्या भोवतीच गोळा होणार
हे ही आपल्या लक्षात आले पण उशिरा...
तिच्यावर झडप घालून
ती आपल्या हाताला लागण्यापुर्वीच
तिला पकडणार्‍या बाकीच्यांना घेऊन
ती आपल्या नजरे समोरून
निघून तर जाणार नाही ना ?
हा प्रश्न ही आपण स्वतःला
अगोदरच विचारायला हवा होता...
त्यांच्या सोबत जाणार्‍या तिच्याकडे
आपण निराशेने पाहत असताना
आपल्या बाजूने आणखी चार-पाच गेल्या
ज्यांच्याकडे आपले दुर्लक्ष झाले
हे ही आपल्या लक्षात आले पण उशिरा...
अशाच दहा-बारा सोडल्यावर
आता कोठे आपल्याला
पहिलीला सोडल्याचा
पश्चाताप होत होता...
पहिलीला सोडून
आपण आपल्या जीवनातील
आपला बहुमूल्य वेळ वाया घालविला
हे ही आपल्या लक्षात येते पण उशिरा...

                     कवी - निलेश बामणे ( एन.डी.)