पावसातील ती..

classic Classic list List threaded Threaded
5 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

पावसातील ती..

संकेत सावंत
वेळ : रात्री ११.४६

ठिकाण : आरे कॉलोनी (गोरेगाव)

रात्रीच्या त्या तीव्र शांततेत आरेचे जंगल अगदी भयानक वाटत होते.. मधूनच जाणारा तो एकला रस्ता... दुतर्फा झाडे... किर्रर्र्र करणारा तो रात पक्ष्यांचा आवाज... अशा वेळी कोणी त्या मार्गावरून जाण्याची हिंमत देखील करत नसे... शिवाय रोजची वाहतूकही एव्हाना कमी झाली होती... मधूनच एखादे वाहन जात होते... तेही अगदी सुसाट... पावसाला देखील नुकतीच सुरुवात झाली होती.. त्यामुळे वातावरणात अगदी गारवा आला होता.. मधेच येणारा सोसाट्याचा वारा देखील झाडांना कवेत घेऊन अगदी हेलावून सोडत होता.. अधून मधून पावसाच्या सरी या चालू होत्याच..

पावसाचा आनंद घेत bike अगदी भरधाव चालवत संकेत रोजच्या प्रमाणे ठरलेल्या दुकानात आला.. हे त्याचं अगदी ठरलेल.. रात्री ११.३० किंवा १२ च्या सुमारास आरेच्या दुधाची चव घेतल्याशिवाय घरी जात  नसे.. त्याने bike बाजूला लावून दुकानात हाक मारली..

संकेत : बाळ्या.. ?? ए बाळ्या.. ? कुठे आहेस बाबा??

(बाळ्या दुकानाच्या मागून येत.. अगदी घामाघूम झालेला.. थर थर कापत.. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची भीती होती)

बाळ्या : दादा.. बर झालं आलास तू.. हे घे दुध... पण लगेच जाऊ नकोस हा.. मी दुकान बंद करतो मग आपण एकत्र जाऊया..

संकेत : बाळ्या ? काय रे.. घाबरला का आहेस तू ? भूत बित पाहिलंस कि काय ?

(बाळ्याकडे बघत दुधाचा एक सिप मारत संकेत म्हणाला)

बाळ्या : दादा.. तिथे समोर बघ ना.. त्या बाकड्यावर कधीपासून एक मुलगी बसली आहे.. ती पण पांढऱ्या ड्रेस मध्ये... आणि कधीपासून ती रडत आहे... ११.३० वाजता अगदी भुतासारखी चालत येऊन ती तिथे बसली आहे.. मला जाम भीती वाटतेय.. चेटकीण तर नाही ना ??

संकेत : गप ए.. काहीपण वेड्यासारखं बडबडू नको... एव्हढी वर्ष काम करतोयस इकडे.. कधी पहिले होतेस का भूत.. आजच कसं येईल.. चल जाऊया.. विचारू तरी तिला कि कोण बाबा तू ??

बाळ्या : अरे काय डोक बिक फिरलं कि काय ?? मी नाय बाबा येणार... अरे bike वाले तर तिला बघून सुसाट पळत सुटले... कोणीच गाडी थांबवायला तयार नाय.. चल आपण पण निघू..

(बाळ्याने दुकान बंद करायला घेतले)

संकेत : अरे ती कोणी भूत बित नाही रे.. माहितेय मला.. तू चल.. घाबरू नकोस.. मी आहे ना सोबत..

बाळ्या : नाय बाबा.. मी चाललो.. असं म्हणून बाळ्या सुद्धा आपल्या सायकल वर बसून अगदी पळत सुटला..

संकेत सरळ त्या मुली जवळ चालत गेला.. आणि तिच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला.. ती मुलगी अजूनही आपल्या चेहऱ्यावर हात ठेऊन अगदी रडत होती..

संकेत : हेल्लो ? excuse me?

(काहीच हालचाल नाही..)

संकेत ने पुन्हा तिच्या समोर चुटकी वाजवून विचारले.. “हेल्लो.. रडताय का तुम्ही?”

त्या मुलीने तात्काळ वर पहिले.. संकेत एक क्षण तिच्याकडे पाहताच राहिला.. रडून रडून लाल झालेले डोळे.. अजूनही डोळ्यात पाणी.. केस विस्कटलेले.. पावसात भिजल्यामुळे थरथरणारे तिचे शरीर.. संकेत तिला पाहतच राहिला.. तिचा अवतार जरी तसा असला तरी ती दिसायला देखणी होती.. गोरा वर्ण.. सडपातळ बांधा.. लांबसडक केस.. पाणीदार डोळे.. नाजूक हनुवटी.. पण एका क्षणी तो भानावर आला..

संकेत : madam.. रात्रीचे बारा वाजत आले आहेत.. हि जागा तुमच्यासाठी योग्य नाही.. तुम्ही तुमच्या घरी जा.. किंवा मी तुम्हाला तुमच्या घरी drop करू का ?

मुलगी : (रडक्या स्वरात) मला घरी नाही घेणार.. पप्पा नाही घेणार.. मला नाही जगायचं आहे.. मी असं नको करायला हव होतं.. मी खरंच खूप मोठी चूक केली..

अस म्हणून ती अजूनच हुंदके देत रडू लागली..

संकेतला आता थोडी कल्पना येऊ लागली होती.. त्याने मनात म्हटले कि “नक्कीच काहीतरी भानगड आहे..”

त्याने घड्याळात पहिले.. बरोबर १२ वाजले होते.. त्याने आजू बाजूला पहिले.. कसली तरी जाणीव त्याला झाली.. ती मुलगी देखील संकेत कडे पाहून रडतच होती.. त्याने क्षणाचाही विलंब न लावता तिला तिथून निघायला सांगितले..

संकेत : madam.. तुम्ही मला address सांगा मी तुम्हाला तिथे नेऊन सोडतो..

मुलगी : (हुंदके देऊन रडत) मी इथे नाही राहत.. मी पुण्याला राहते.. मी इथे कोणालाच नाही ओळखत..

त्या मुलीचे रडणे काही केल्या थांबेना.. जणू काहीतरी मोठी घटना तिच्या आयुष्यात घडली असावी असा संशय संकेत ला येऊ लागला.. त्या मुलीची परिस्थिती फारच वाईट होती.. ती तशी शुद्धीतच नव्हती.. रडून रडून तिची अवस्था फारच वाईट झाली होती.. ती जर इथे राहिली तर नक्कीच कोणीतरी तिचा गैर फायदा घेऊ शकेल.. म्हणून मनाशी पक्का विचार करून संकेत ने तिला घरी न्यायचे ठरवले.. संकेत ने तिचा हात घेऊन हळूच तिला सावरत कसे बसे bike पर्यंत आणले.. बाकड्याच्या बाजूलाच तिची bag त्याला दिसली.. त्याने ताबडतोब धावत जाऊन ती bag आणली.. तोपर्यंत ती मुलगी अगदी शून्यात नजर गेल्याप्रमाणे एकटक समोर बघत उभी होती.. संकेत ने तिला bike वर बसवले आणि थेट घराकडे निघाला.. वाटेत त्याच्या मनात एक प्रकारची भीती होती कि हिने चालत्या bike वरून उडी मारली नाही म्हणजे झालं.. त्यामुळे संकेत देखील bike फार वेगात चालवत नव्हता..

building खाली आल्यावर watchmen ने आत येण्यासाठी संकेत साठी gate उघडला.. त्याच्या मागे बसलेल्या मुलीला पाहून तोही विचारात पडला असावा.. संकेत ने bike पार्क करून त्या मुलीला सावरत लिफ्ट पर्यंत आणले.. आता तिचे रडणे पूर्णपणे थांबले होते.. अजूनही फक्त शांत आणि कोणत्यातरी खोल विचारात अगदी गडून ती गेली होती.. संकेत ने घराची किल्ली काढून दार उघडले.. तिला आत नेले.. आणि दार बंद केला..

तिची bag एका बाजूला ठेऊन तिला सोफ्यावर बसवले.. आणि तिला पाण्यासाठी विचारले.. तिने देखील नुसती मान हलवून त्याला नकार दर्शवला.. पण तिची नजर एकाच ठिकाणी होती.. जणू जिवंत मुडदाच.. संकेत ने तिला बेडरूम मध्ये नेले..

संकेत : तुम्ही आता इथे झोपा आपण उद्या बोलू.. आणि मी बाहेर गेलो कि तुम्ही आतून कडी लावून घ्या.. म्हणजे उगाच तुमच्या मनात असा विचार नको यायला कि मी तुमचा गैर फायदा वैगरे घेईन.. so शांत झोपा.. कसली गरज लागली तर लगेच हाक मारा.. मी बाहेर hall मधेच आहे..

असं म्हणून संकेत दारापर्यंत गेला.. तोपर्यंत ती मुलगी बेड वर बसून पुन्हा शून्यात नजर लावून बसली होती..

संकेत जाता जाता तिला म्हणाला “आणखी एक.. मला नाही माहित तुमच्यासोबत काय झाले आहे.. पण जे झाले आहे ते योग्य नाही हे नक्की.. पण तुम्ही असले कोणतेही कृत्य करू नका कि जेणेकरून मला त्याचा त्रास होईल.. मी माणुसकीच्या नात्याने तुम्हाला आश्रय दिला आहे.. आपल्या जीवाचं बर वाईट करण्याआधी माझा विचार करा.. एव्हढी एकच विनंती..”

अस म्हणून संकेत बेडरूम च्या बाहेर पडला आणि तसच hall मध्ये सोफ्यावर जाऊन पडला.. मनात मात्र एकच विचार “बिचारीला कसला तरी जबरदस्त धक्का बसलाय.. काहीच कळत नाही आहे.. जीवाचं काही बर वाईट नाही केलं म्हणजे मिळवलं.. नाहीतर माझे वांदे व्हायचे... मी पण काय विचार करतोय.. काहीनाही होणारं.. उद्या सकाळी विचारू तिला...सकाळी बोलतं करतो.. चला झोपा आता..”

सकाळी संकेत ला जाग आली ती कोणाच्या तरी रडण्याच्या आवाजामुळेच.. तो खडबडून जागा झाला.. डोळे चोळत तो त्या आवाजाचा वेध घेऊ लागला.. आवाज त्याच्याच बेडरूम मधून येत होता.. तो तसाच उठून बेडरूम कडे धावत गेला.. ती मुलगी पुन्हा रडत बसली होती.. संकेत तिच्या पुढ्यात जाऊन कसा बसा तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला.. थोडा वेळ गेल्यावर ती एकदाची शांत झाली.. पण अजूनही तिचं दु:ख तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं.. पण कालच्या सारखी परिस्थिती नव्हती हे पाहून संकेत ला अगदी हायसे वाटले..

संकेत : आता एकदम relax व्हा.. तुम्हाला पाणी आणून देऊ का ?

मुलगी : (अगदी नरमलेल्या स्वरात) हो please..

संकेत ने ताबडतोब तिला पाणी आणून दिले.. पाणी पिऊन झाल्यावर संकेत ने तिला काही खाणार का म्हणून विचारले.. त्यावर तिने काहीच खायची इच्छा नाही असे सांगितले..

संकेत : अहो थोड तरी खा.. मी पटकन कांदेपोहे करतो..

मुलगी : नाही please.. तुम्ही नका त्रास करून घेऊ.. already तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं आहे.. त्यासाठी खरंच thanks..

संकेत : बरं ठीक आहे.. पण आधी मला सांगा तुमचं नाव काय ? आणि if you don’t mind नक्की काय घडलं आहे तुमच्या सोबत..

ते ऐकताच तिने एकवेळ संकेत कडे पहिले आणि जणू ती flashback मध्ये गेली..

माझं नाव आरती देशपांडे.. मी पुण्यात शिवाजी नगर जवळ राहते.. घरी आई, बाबा, मी आणि माझी लहान बहिण असतो.. मला एक मोठी बहिण देखील आहे पण तिने पळून लग्न केल्याने बाबांनी तिच्याशी संबंध तोडून टाकला आहे.. आमचे बाबा खूपच strict आहेत.. त्यांना या गोष्टींची भयंकर चीड आहे.. college मधून वेळेवर घरी येणे असा बाबांनी नियमच करून ठेवला होता.. आम्ही कधी कोणा मुलासोबत बोलताना दिसलो तर लगेच घरी येऊन आम्हाला ओरडा पडतो.. पण माझी ताई तशी धीट च होती.. तिने आमच्या बाबांना न जुमानता ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांच्याशीच लग्न केलं.. आणि आनंदाची बाब अशी कि ती आज तिच्या आयुष्यात खूप खुश आहे.. जीजू सुद्धा खूप प्रेम करतात तिच्यावर.. पण तरीही बाबांचा विरोध हा आजही आहेच.. त्यामुळे ताई अधून मधून बाबा नसताना आम्हाला भेटायला येत असते.. माझं graduation पूर्ण झाल्यावर मी एका खासगी बँकेत कामाला लागले.. college चा नियम हा कामाच्या बाबतीत देखील लागू होता.. त्यामुळे रोज वेळेवर बँकेत येणे आणि जाणे हे ठरलेले होते.. कधी कोणा मुलाशी बोलेणे नाही.. काही नाही.. जे काही बोलणे असायचे ते फक्त कामाशी निगडीत.. त्यातच एक दिवस असे कळले कि आमचे जे जुने manager होते त्यांची बदली दुसरीकडे झाली आहे आणि त्यांच्या ऐवजी दुसरा manager इथे रजू होणार होता.. त्याप्रमाणे आम्ही आमच्या जुन्या manager ला निरोप देऊन त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या..

दुसऱ्याच दिवशी नवीन manager येणार असल्या मुळे सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी अगदी वेळेत हजर होते.. इतक्यात एका gray रंगाच्या होंडा city मधून एक उंचापुरा आणि देखणा माणूस उतरला.. अगदी सूट बूट घालून.. असे वाटत होते कि याने manager नव्हे तर बँकेचा CEO असायला हवे होते.. काय जबरदस्त personality होती त्यांची... सर्वांना वाटले होते कि हा सुद्धा जुन्या manager सारखाच वयस्कर असावा.. पण सर्वांचा अंदाज खोटा ठरला होता.. हा तर तिशी च्या आसपास पण नसेल अशी सर्वांची खात्री झाली.. तो जेमतेम माझ्याच वयाचा असावा असे मला वाटले.. प्रत्येकाशी हस्तांदोलन करत तो ओळख करून घेत होता.. ज्यावेळी तो माझी ओळख करून घेण्यासाठी माझ्याजवळ आला त्यावेळी एक टक माझ्याकडे पाहतच राहिला.. मीही त्यालाच पाहत बसले.. एक छोटीशी smile करत त्याने म्हटले “Hi.. I am अभिषेक राजे.. whats your name ?”

“आरती.. आरती देशपांडे”

“you have very beautiful eyes”

असे म्हणताच तो कॅबीन मध्ये निघून गेला.. मी देखील त्याच्याकडे पाहतच राहिले.. अगदी कोणालाही स्वतःकडे आकर्षित करेल असे त्याचे व्यक्तिमत्व होते..

थोडा वेळ झाल्यावर त्याने मला कॅबीन मध्ये बोलावून घेतले..

अभिषेक : आरती right ?

आरती : yes sir

अभिषेक : sit..

त्याप्रमाणे मी बसले आणि त्याने बोलायला सुरुवात केली..

अभिषेक : look आरती.. मी इथे नवीन आहे त्यामुळे इथे कामं कशी होतात याची मला माहिती घायची आहे.. आणि त्यासाठी मी तुझी निवड केली आहे.. I hope कि तू मला मदत करशीलच..

मी त्याला तात्काळ होकार देऊन टाकला..

इथे बाकी मुली जणू जळून जळून खाक झाल्या असतील कारण त्या सर्वांमधून त्याने चक्क माझी निवड केली होती.. पण त्याने माझी निवड का केली होती याचा विचार न करता त्याने माझी निवड केली या बद्दल मला स्वतःचा अभिमान वाटत होता..

जास्तीत जास्त वेळ मी त्याच्या कॅबीन मध्ये घालवू लागले.. त्याला प्रत्येक माहिती अगदी समजून सांगत होते.. या सर्व गोष्टी करता करता आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो होतो.. त्यामुळे lunch , coffee या गोष्टी देखील एकत्र करू लागलो.. आता तर त्याने मला sir न बोलता सरळ अभी बोल असे सांगून टाकले होते.. त्यामुळे मी सुद्धा अगदी बिनधास्त पणे “अभी हे कर किंवा अभी ते कर” अशा orders देत होते.. कधी late पर्यंत काम करावे लागल्यावर तो स्वतः मला त्याच्या कार मधून घरी सोडायला यायचा.. तो बँकेचा manager असल्यामुळे बाबांनीही कधी विरोध दर्शविला नव्हता..

पण आजकाल असे वाटत होते कि मी त्याच्या प्रेमात तर नाही न पडले आहे.. असेलही.. कारण सारखा मला त्याचा सहवास हवाहवासा वाटू लागला होता.. त्यामुळे आमचे फोन calls सुद्धा फार वाढले होते.. बाबांशी चुकवून मी गपचूप त्याच्याशी बोलायचे.. त्यातच एक दिवस मी त्याच्या कॅबीन मध्ये बसले असताना त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली.. आणि आपल्या भावनांना मोकळीक दिली.. मी देखील त्याच्यावर प्रेम करत असल्याचे तात्काळ सांगून टाकले.. पण त्यासोबत असेही सांगितले कि जर तुला माझ्याशी लग्न करायचे असेल तर तुला माझ्या घरी येऊन माझ्या बाबांशी बोलावे लागेल..मला नाही वाटत बाबांनी यावर काही विरोध दर्शविला असता.. कारण मुलगा तर well settled देखील होता.. पण मी स्वत: बाबांना काही बोलेन एव्हढी माझी हिंमत नव्हती.. माझ्या बोलण्यावर अभीने “येईन ग.. त्याला अजून वेळ आहे.. आधी या प्रेमात आणखी बुडून तर जाऊ दे” असं म्हणत माझ्या हातावर kiss केले.. आमच्या भेटी गाठी वाढल्या होत्या.. सुट्टीच्या दिवशी हि बँकेत काम आहे असे खोट सांगून मी त्याला भेटायला जात असे..

एकदिवस त्याने मला त्याच्या घरी नेले होते.. घरी तसे कोणीच नव्हते तो एकटाच राहत होता.. family बद्दल विचारले असता “ते सर्व बंगलोरला असतात” असे सांगितले होते.. त्या दिवशी तो भलताच मूड मध्ये होता.. माझा हात पकडून तो मला त्याच्या बेडरूम मध्ये घेऊन गेला.. आणि मला अक्षरशः बेड वर ढकलून दिले.. मी म्हटले “काय प्रकार आहे..” त्यावर त्याने “डार्लिंग आज माझा खूप मूड आहे so please नाही म्हणू नकोस..” असे उत्तर दिले..

आरती : अभी हे बघ.. हे सर्व आता योग्य नाही.. तू का नाही माझ्या घरी येऊन लग्नाची बोलणी करत आहेस?

अभी : अग dear मी परवा नक्की तुझ्या घरी येईन बोलणी करण्यासाठी.. खुश..

असं म्हणत तो मला kiss करण्यासाठी माझ्या जवळ येऊ लागला.. पण मी त्याला तिथेच रोखले आणि हे सर्व लग्नानंतर असे म्हणत मी तिथून निघून आले..

घरी जाता जाता मधेच मला अभिचा फोन आला.. माफी मागण्यासाठी तो फोन होता.. मी सुद्धा त्याला लगेच माफ करून उद्या बँकेत भेटण्याचे promise केले..

दुसऱ्या दिवशी बँकेत आल्यावर रोजच्या सारख्या गप्पा झाल्या.. पण त्यावेळी तो मला म्हणाला कि तो उद्या मुंबई ला त्याच्या काकांना भेटायला जाणार आहे.. तसा तो अधून मधून जात असायचा.. पण उद्या तो माझ्या घरी बोलणी करण्यासाठी येणार होता.. त्या बद्दल त्याला विचारले असता तो मुंबई वरून आल्यावर लगेच तुझ्या घरी येईन असे म्हणाला.. आणि तो मुंबई ला निघून गेला..  पण २ दिवस झाले त्याचे मुंबईचे काम संपतच नव्हते.. आणि त्यात आता माझ्या घरी माझ्यासाठी मुलगा बघू लागले होते.. त्यामुळे मला आणखीनच tension येऊ लागले.. मी रोज त्याला फोन करून विचारू लागले.. आणि माझ्या लग्नाबद्दल हि त्याला सर्व सांगितले.. येत्या २ दिवसात मी येतो असं म्हणून त्याने फोन ठेऊन दिला.. इथे माझे लग्न ठरले होते.. मी एक वेळ विचार केला कि बाबांना अभी बद्दल सांगावे.. पण त्यांना आवडलं नसतं तर ? माझी हिम्मतच होत नव्हती... त्यामुळे मी त्यांना काही सांगितले असते तर त्यांनी जबरदस्तीने माझे लग्न लवकरात लवकर लावले असते असे देखील होऊ शकले असते.. त्यात माझ्यासाठी आणखी वाईट बातमी म्हणजे येत्या २ दिवसातच माझा साखरपुडा करायचे ठरले.. तेव्हापासून बाबांनी बँकेतून सुट्टी घ्यायला लावली होती.. शिवाय बाहेर कुठेही जायचे नाही अशी सक्त ताकीद देखील दिली होती.. मी तेव्हाच निर्णय घेतला.. आता पळून जाण्याशिवाय माझ्याकडे काहीही पर्याय नाही.. त्यानुसार मी एक चिट्ठी लिहून ठेवली होती आणि दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी मी मुंबई ला जायचे ठरवले.. तसं मी बँकेत जाऊन अभि चा मुंबई मधला address घेऊन ठेवला होता.. आणि finally मी आता ट्रेन मध्ये होते.. संध्याकाळचे ६.३० झाले होते.. कधी एकदा मुंबई ला जाते आणि अभि ला भेटते असं मला झालं होतं..

मी या पूर्वी कधीच मुंबई ला आले नव्हते.. पण तशी मी घाबरून जाणारी नव्हते.. मी अभि ला फोन लावायचा प्रयत्न करत होते पण तो उचलतच नव्हता.. कदाचित busy असेल म्हणून मी सुद्धा पुन्हा फोन करायचे टाळले.. इथे गाडीने देखील वेग घेतला होता.. मी सुद्धा त्याच वेगात अभि आणि माझ्या आठवणींमध्ये हरवून गेले.. त्या आठवणी आठवता आठवता मला झोप केव्हा लागली ते कळलेच नाही.. जाग आली तेव्हा दादर स्टेशन आलेले होते.. रात्रीचे चक्क ०९.४५ झाले होते.. मी धावतच स्टेशन च्या बाहेर आले.. बाहेर आल्यावर मी एका taxi वाल्याला अभि चा पत्ता दाखवला.. त्याला तो पत्ता ओळखीचाच होता त्यामुळे मला तिथे नेऊन सोडण्याचे त्याने मान्य केले.. मी लगेच taxi च्या मागच्या seat वर जाऊन बसले.. अभि ला भेटायचे या एकाच गोष्टीमुळे मी खूप खुश होते.. मी पुन्हा त्याला फोन लावायचा प्रयत्न केला पण तरीही तो फोन उचलेनाच.. तेव्हा त्याला surprise च द्यावे असं मी मनाशी ठरवले.. तासाभरातच मी तिथे पोचले.. आता मी अभि च्या building खालीच उभे होते.. मी आत शिरले आणि ४ माळा गाठला.. रूम no ४०५ जवळ गेले आणि बेल वाजवली.. एका वयस्कर बाईने दरवाजा उघडला..

बाई : yes, कोण हवंय आपल्याला..

मी काही बोलायला जाणार तेव्हढ्यात त्या बाईच्या मागे अभि एका मुलाला घेऊन खेळवताना मला दिसला..

“dadu ना kissi नाही देणार.. अश नाय कलणार ना बबडू..” असं म्हणता म्हणता त्याची नजर माझ्यावर पडली.. माझे भरलेले डोळे आणि रडकुंडीला आलेला चेहरा पाहून त्याने ताबडतोब आपल्या मुलाला खाली ठेवत माझ्याजवळ आला.. त्याच्या मागोमाग त्याची बायको आली “कोण आलंय हो ?”

तो मला येऊन काही सांगणार इतक्यातच मी माझ्या अंगात जितका जोर उरला होता तितक्या जोरात त्याच्या कानसुलात लगावली.. काही क्षण सर्वजण स्तब्ध झाले.. तो सुद्धा गालावर हात ठेऊन मान खाली घालून उभा होता.. “आयुष्यात पुन्हा माझ्या समोर कधी येऊ नकोस” रडत रडतच मी तिथून बाहेर पडले.. रडता रडता मी कुठे येऊन बसले होते ते मला सुद्धा नाही ठाऊक आणि मग तुम्ही आलात..

आरतीची अशी परिस्थिती जाणून घेतल्यावर संकेत सुद्धा काहीवेळ स्तब्ध झाला.. काय बोलावे काहीच सुचेना.. पण तरीही तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागला..

संकेत : हे बघा आता जे झालं ते झालं.. आणि मी तर म्हणेन कि एक प्रकारे चांगलेच झाले ना.. आधीच तुम्हाला हा सर्व प्रकार कळला.. मी तुमच्या भावनांचा आदर करतो.. तुम्ही जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यावर पण तुम्हाला कुठे माहित होतं कि तो विवाहित आहे.. आणि सरळच बोलतो.. तुमच्यात physical सबंध नाही आले ते महत्वाचं नाही का? वेळ निघून गेल्यावर हे सर्व कळल असतं तर कितीला पडलं असतं.. त्यामुळे आता तुम्ही रडण थांबवा.. आणि घरी जाऊन बाबांना कसं मनवायच याचा विचार करा..

आरती : (रडतच) तुम्ही माझ्या बाबांना नाही ओळखत.. आता जीव गेला तरी ते मला घरी घेणार नाहीत.. साखरपुड्याच्या दिवशी मी पळून आले आहे.. निदान त्यांच्या इज्जतीचा सुद्धा विचार केला नाही.. वाटलं होतं इथे येऊन अभि ला भेटेन आणि मग घरी जाऊन दोघे मिळून बाबांची समजूत घालू.. आता काय करू मी ? कशी जगू ? कुठे राहू ? काहीच सुचत नाही आहे..

संकेत : तुम्ही आधी रडणं थांबवा बघू.. हव तर मी येऊ का तुमच्या बाबांशी बोलायला.. मी त्यांना समजावून बघतो..

आरती : नाही हो .. ते नाही ऐकणार.. एकवेळ माझा जीव घेतील पण आता घरी कधीच नाही घेणार..

आरतीची मानसिक स्थिती फारच बिघडली होती.. संकेत ला सुद्धा तिला सांभाळणे अवघड जात होते.. पण तरीही तो प्रयत्न करतच होता.. कसे बसे शेवटी त्याने आरती ला शांत केले..

संकेत : आता कसं... तुम्ही आता जास्त विचार करू नका.. कसलाच विचार करू नका.. जे झालं ते आता कायमचं विसरून जा.. आणि बाबांबद्दल विचार करायला आपल्याकडे भरपूर वेळ आहे.. so आता मी सांगतो तसं करायचं.. ऐकाल माझं ?

आरतीने त्याच्याकडे पाहत मान हलवून होकार दर्शविला..

संकेत : good.. आता तुम्ही अंघोळीला जा.. तोपर्यंत मी मस्त नाश्ता बनवतो..

आरती : अहो मी करते नाश्ता.. तुम्ही नका त्रास करून घेऊ.. तुम्ही आधी अंघोळ करून घ्या..

संकेत : ऐकायचं कोणाचं ठरलं आहे.. तुमचं.. so मी जसं बोलेन तसच करायचं.. असं म्हणून त्याने तिची bag तिला आणून दिली..

आरती अंघोळीला निघून गेल्यावर संकेत kitchen मध्ये नाश्ता बनवू लागला.. थोड्याच वेळात आरती अंघोळ करून आल्यावर तिने संकेतला देवा-याबद्दल विचारले.. संकेत ने हातानेच देवरा बाजूला असल्याचा इशारा केला.. इथे आरतीला देवापुढे नमस्कार करताना पाहून संकेत मनात म्हणू लागला “पोरगी संस्कारी दिसतेय..” :D

संकेत kitchen मध्ये असतानाच आरती देखील तिथे आली आणि तिने देखील हातभार लावायचा प्रयत्न केला..

आरती : तुम्ही जा आता अंघोळीला.. मी बघते नाश्ताच..

संकेत : अहो त्याची काही गरज नाही.. सर्व अगदी ready आहे.. तुम्ही बसा..

आरती : अहो तुम्ही आधी अंघोळ तर करून या मग एकत्र बसुया..

संकेत : अहो काल पासून तुम्ही काही खाल्ले नाही आहे.. so तुम्ही करा सुरुवात.. तोपर्यंत मी येतो अंघोळ करून.. आणखी एक..

आरती : काय ?

संकेत : सगळा नाश्ता नका खाऊ हा.. थोडासा मला पण ठेवा..

ते ऐकून थोडेसे का होईना पण आरतीच्या चेहऱ्यावर हसू उमलेले होते..

संकेत : वाह.. म्हणजे हसता येत तर तुम्हाला.. पण मी मस्करी करत नव्हतो.. खरंच सगळा खाऊ नका..

असं म्हणून दोघेही मनमुराद हसू लागले..

आरती : तुम्ही जा अंघोळीला.. मी तोपर्यंत वाट पाहते..

संकेत ताबडतोब आपली अंघोळ आटपून बाहेर आला आणि दोघेही dining table वर समोरासमोर नाश्ता करण्यासाठी बसले.. नाश्ता करता करता आरतीने सहज संकेत ला विचारले

आरती : तुम्ही एकटेच राहता इथे?

संकेत : हो.. म्हणजे आधी family होती पण आता आई आणि बाबा गावी राहतात.. लहान भाऊ बंगलोर ला असतो.. आणि मी इथे एकटा..

आरती : पण मग तुमचं जेवण वैगरे ?

संकेत : मी करतो ना.. हा जो नाश्ता तुम्ही खाताय तो मीच बनवलाय.. :P

आरती : छान बनवला आहे.. आणि तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत.. पुन्हा एकदा thanks...

संकेत : काय हो.. नाश्ता आवडला नाही तर तसं सांगा ना.. शिव्या का घालताय.. कालचा दिवस विसरून जा.. आपल्या आयुष्यातून तो दिवस वजा करा..,

आरती : इतकं सोप्प असतं तर सांगायलाच नको हव होतं..

संकेत : का नाही ? आता किती वेळ तुम्ही ते दु:ख आठवून रडत राहणार आहात.. मला सांगा.. एखादा joke तुम्ही जास्तीत जास्त १ किंवा २ वेळा ऐकून हसू शकता पण तोच joke जर सारखा ऐकलात तर हसू नाही येणार उलट कंटाळा येतो त्याचा.. या दुःखाच पण तसच आहे.. नाही का?

आरती : हो.. मी प्रयत्न करेन..

संकेत : thats good.. चला आता आपल्याला shopping ला जायचे आहे..

आरती : कुठे ?

संकेत : चला तर.. खूप काही घायचे आहे.. सर्व सामान घेऊन परवा निघायचे आहे..

आरती : तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का परवा ?

संकेत : तुम्ही नाही.. आपण.. आपण परवा आपले सर्व सामान घेऊन फिरायला जाणार आहोत..

आरती : पण कुठे ? आणि सामान कशाला ? आणि तुमचे office ?

संकेत : कुठे ते उद्या सांगतो.. सामान या साठी कारण आपण तिथे साधारण एक महिना तरी राहणार आहोत.. एक पिकनिक समजा ना.. तुमच्यासाठी memorable अशी पिकनिक असेल हि.. आणि तुम्हाला तिथे फ्रेश देखील वाटेल.. मी सुद्धा office मध्ये १ महिन्याची सुट्टी टाकली आहे.. so परवा सकाळी  आपल्याला निघायचे आहे..

आरती : अहो पण नाव तर सांगा place च..

संकेत : उद्या..

अस म्हणत एक smile देत संकेत तिला shopping साठी घेऊन गेला..

आरती ला देखील अशा पिकनिक ची गरज होतीच.. साधारण संकेत च्या स्वभावाचा देखील तिला अंदाज आला होता त्यामुळे तिने देखील त्या पिकनिक साठी अजिबात विरोध दर्शविला नव्हता..

shopping गेल्यावर संकेत आरतीला खूप हसवण्याचा प्रयत्न करत होता.. तिने कसे बसे आपल्या past ला विसरावे याचाच जास्त विचार करत होता.. कारण त्या रात्रीचा तिचा अवतार तो अजूनही विसरला नव्हता.. सतत त्याच्या डोळ्यासमोर तीच आरती त्याला दिसत होती.. त्या रात्रीच्या पावसातील ती जशी दिसत होती ते पाहून संकेत ला काहीतरी गवसल्या सारखे झाले होते..

shopping वैगरे झाल्यावर दोघेही घरी आले.. जेवण वैगरे उरकून दोघांनी आराम करायचे ठरवले... संकेत hall मध्ये सोफ्यावर आडवा झाला.. पण आरती मात्र अजूनही त्याच विचारात गर्क होती.. तिच्या मनातून ती गोष्ट जाता जात नव्हती.. एका क्षणी तिने संकेत चा विचार केला.. मनोमनी तिने देवाचे आभार मानले.. कसा हा मुलगा मला भेटला.. कशी त्याने माझी मदत केली.. मनात काहीही वाईट विचार न करता मला घरी आणले.. सर्व गोष्टींचा विचार करता करता तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.. त्यातच तिला झोप केव्हा लागली तिला देखील नाही कळले.. जाग आली ती संकेत च्या हाकेने.. चहा चा मग पुढे करत तो तिला म्हणाला “madam अजून झोपायचा असेल तर झोपू शकता.. नाहीतर हा गरमा गरम चहा घ्या.. एकदम फ्रेश वाटेल..” तिने सुद्धा उठनेच पसंत केले.. संकेत च्या हातातील चहाचा मग घेत तिने त्याला thanks म्हटले..

संकेत : बाहेर बघा काय मस्त पाऊस पडतोय.. एक महिना वाट पाहायला लावल्यानंतर आता पुन्हा कुठे सुरुवात केली आहे.. टार्गेट complete करायचे असणार...Jतुम्हाला आवडतो का हो पाऊस ?

आरती : एव्हढ काही नाही पण पहिला पाऊस आवडतो... तोच काय तो सुख देणारा असतो.. नंतर मात्र तो सुद्धा कंटाळवाणा वाटतो...

संकेत : अच्छा... पण मला मात्र पाऊस खूप आवडतो.. तो जेव्हा पण येतो तेव्हा सोबत काही ना काही घेऊन येतो...

आरती : काय ?

संकेत : अहो म्हणजे सर्व आपल्या आठवणी.. शाळेत केलेली पावसातील धमाल.. त्यानंतर college, office... सर्वच अगदी डोळ्यासमोर येऊन उभं राहत.. या पावसात तुम्ही भेटलात... thanks

आरती : thanks तुम्ही का म्हणताय.. उलट मी तुम्हाला thanks म्हणायला हव..

संकेत : मी तुम्हाला वेगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला thanks म्हटलं ..

आरती : कोणत्या ?

संकेत : मला माझ्या स्टोरी साठी नाव सुचत नव्हतं... ते तुमच्या मुळे सुचलं... ज्या रात्री मी तुम्हाला पाहिलं त्या क्षणी माझी स्टोरी अचानक माझ्या समोर येऊन उभी राहिली.. त्याक्षणी ठरवलं कि माझ्या स्टोरी च नाव असेल “पावसातील ती”

आरती : how sweet.. आणि तुम्ही स्टोरी लिहता ? wow... लेखक आहात तर..

संकेत : नाही हो.. स्टोरी मी माझ्यासाठी लिहतो.. उद्या जेव्हा माझी बायको येईल तेव्हा तिला वाचायला देण्यासाठी..

आरती : खूप lucky असेल तुमची बायको..

संकेत : बघू आता.. कोणाचं ध्यान पडतंय गळ्यात :D

आरती (हसत) : काहीही.. मिळेल तुम्हाला हवी तशी.. मी एक विचारू तुम्हाला ?

संकेत : २ विचारा..

आरती : सध्यातरी एकच... त्या रात्री जेव्हा तुम्ही माझ्या जवळ माझ्याशी बोलायला आलात तेव्हा तुम्हाला भीती नाही वाटली?

संकेत : भीती कसली ?

आरती : कारण बहुतेक लोक मला पाहून घाबरून जात होते.. कोणीही माझ्याजवळ सुद्धा येऊ पाहत नव्हतं.. तुम्ही कसे काय आलात ?

संकेत (गालातल्या गालात हसत): तुम्हाला जर सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही..

आरती : आवडेल मला ऐकायला..

संकेत : मला असे आत्मे दिसतात ज्यांच्या इच्छा अपूर्ण असतात.. त्यामुळे माणूस आणि आत्मा या मधला फरक मला कळतो कारण मी एक paranormal expert आहे..

आरती एक क्षण त्याच्या कडे पाहतच राहिली.. एक वेळ तिला वाटलं कि हा मस्करी तर करत नाही आहे ना.. पण संकेत च्या बोलण्यातील आत्मविश्वास पाहून तिचा विश्वास बसला...

संकेत : त्या दिवशी जेव्हा रात्रीचे १२ वाजले होते त्यावेळी तिथे असे आत्मे बाहेर येऊ लागले होते आणि त्यामुळे मला तुम्हाला तिथे एकट सोडण बरोबर वाटतं नव्हत आणि म्हणून मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन आलो...

आरती : ok

संकेत : घाबरू नका आपल्या घरात तसे काही नाही आहे :D

आरती : (सुटकेचा निश्वास टाकत) thank god

दिवस असाच गप्पांच्या ओघात निघून गेला.. आणि तो दिवस उजाडला ज्या दिवशी दोघेही बाहेर जाणार होते.. संकेत ने अजूनही कुठे जायचे आहे या बद्दल आरतीला अजिबात कल्पना दिलेली नव्हती... तशी आरती देखील तितकीच उत्सुक होती.. मनातील दु:ख देखील थोड्या प्रमाणात कमी झाले होते..

सकाळचे ५ वाजले होते.. संकेत सर्व सामान घेऊन बिल्डिंग खाली आरतीची वाट पाहत उभा होता.. आरती घर lock करून खाली आल्यावर समोर तिने गाडी पहिली.. ज्या गाडीने ते प्रवास करणार होते..

आरती : गाडी छान आहे तुमची..

संकेत : माझी नाही आहे... मित्राची आहे.. मी दरवर्षी जेव्हा असा बाहेर जातो त्यावेळी त्याचीच गाडी घेऊन जातो..

आरती : मग तुम्ही स्वतःची का नाही घेत ?

संकेत : काय सांगू madam.. दुसऱ्यांची गाडी चालवण्यात जी मजा आहे ना ती आपल्या गाडीत नाही.. :P

आरती : अच्छा ?

संकेत : हो ना ... सो madam.. ती वेळ आली जेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे कि आपण कुठे जाणार आहोत ?

आरती उत्सुकतेने त्याच्याकडे पाहू लागली...

संकेत : कुंभवडे, कणकवली म्हणजे माझ्या गावी..

आरती : oh.. wow..कणकवली मी ऐकले आहे... कोण कोण असतं गावी ?

संकेत : आई, पप्पा, काका, काकी.. मी दरवर्षी पाऊस सुरु झाला कि गावी जातोच जातो.. यावर्षी जरा उशीरच झाला म्हणा..

आरती : अच्छा.. पण मग आता मी तुमच्यासोबत आहे.. मग त्यांना काय वाटेल ?

(गाडी सुरु करत)

संकेत : त्यांना काही वाटणार नाही.. कारण मी अगोदरच त्यांना सांगून ठेवले आहे कि माझी एक मैत्रीण सुद्धा माझ्यासोबत येत आहे.. आम्ही अगोदर एकत्र काम करत होतो पण मग मी जॉब change केला..

आरती : म्हणजे खोटं सांगितलात.. चुकीचं आहे ना हे...(अपराधीपणाच्या भावनेने)

संकेत (गमतीच्या स्वरात) : मग काय सांगू.. ती मला आरेच्या जंगलात रात्री ११.३० वाजता भेटली.. रडत होती खूप.. मला दया आली म्हणून मी तिला घरी घेऊन आलो... असं सांगू का ??

आरती : हो का नाही?

संकेत (हसतच) : कसं आहे ना देशपांडे.. असं जर सांगितलं ना तर मला खूप साऱ्या प्रश्नांना तोंड द्याव लागेल... कोण ती ? असं कसं घरी घेऊन आलास? असं करतात का? वैगरे वैगरे... आम्ही मालवणी लोकं पोलिसांपेक्षा जास्त चौकशी करतो.. कारण काळजी देखील तेव्हढीच असते... बाहेरून जरी कठोर असलो तरी मनाने तितकेच प्रेमळ आणि दयाळू असतो... so जास्त विचार करू नका.. पिकनिक एन्जोय करा.. यासाठीच चाललो आहोत आपण... लक्षात ठेवा.. तुम्ही आणि मी अगोदर एकत्र काम करत होतो.. मी अगोदर CET infotech या कंपनी मध्ये accounts मध्ये काम करायचो... तुम्हाला कोणी काही विचारलं तर असंच सांगा आणि कंपनी चे नाव देखील लक्षात ठेवा..

आरती शांतपणे संकेत च्या सर्व सूचना ऐकून घेत होती...

संकेत : आणि एक.. आपल्याला एकमेकांना एकेरी नावाने हाक मारावी लागेल... तुम्ही, आपण असं काही नाही चालणार...

आरती : never mind...

संकेत : मग आतापासूनच त्याची सवय लावून घेऊया..

आरती : हो चालेल ना..

अधून मधून दोघांच्या गप्पा चालूच होत्या.. आरती मोकळेपणाने बोलत आहे असे पाहिल्यावर संकेत ने थोडा गंभीर विषयावर बोलायचे ठरवले..

संकेत : एक विचारू तुला ?

आरती : हो विचार ना ? permission कसली घेतोस ?

संकेत : actually प्रश्न तसा खाजगीच आहे.. म्हणून..

आरती : विचार चालेल मला.. मला माझी life खाजगी नाही वाटत...

संकेत : बरं.. तुझे बाबा love marriage च्या बाबतीत इतके strict का आहेत ?

आरती : ते अजून मलाही माहित नाही आहे.. आणि आम्ही कधी विचारण्याचे धाडस देखील केले नाही.. आईला एकदा - दोनदा विचारायचा प्रयत्न केला होता पण ती देखील आम्हाला टाळायची मग आम्ही विचारच सोडून दिला..

संकेत : म्हणजे नक्कीच काहीतरी असेल असं नाही वाटत तुला ?

आरती : हो वाटत पण मला नाही कधी इतक्या deep मध्ये विचार करावसा वाटला.. तुला का असं विचारावस वाटलं ?

संकेत : खर तर आजकाल कोणी love marriage ला विरोध करत नाहीत.. जर मुलगा किंवा मुलगी वेगळ्या जाती मधली असेल किंवा मुलगा settle नसेल तर गोष्ट वेगळी होती... इथे कोणी एखादा मुलगा किंवा मुलगी आपल्याला आवडली तर तिला किंवा त्या मुलाला न बघताच ते विरोध दर्शवतात... मला वाटतं नक्कीच एखादी अशी घटना त्यांच्या मनात कायमची रुजली आहे कि ज्यामुळे ते love marriage च्या बाबतीत तुझ्याशी strict वागायचे...

आरती : हो रे.. मी असा कधी विचारच केला नव्हता... पण आता काय उपयोग.. मला नाहीच वाटत मी त्यांना पुन्हा कधी भेटू शकेन.. त्यांनाच काय rather कोणालाच भेटू नाही शकणार.. (डोळे पुसत)

संकेत : (आत्मविश्वासाच्या सुरात) भेटणार.. अगदी सर्वांना भेटणार.. trust me..

आरती : कसे काय ??

संकेत : त्याचा आता विचार करू नकोस.. आता आपल्याला खूप धमाल करायची आहे गावी.. सो चिल..

आरती : ok sir ... आता मी तुला काही विचारू ?

संकेत : हो विचार ना...

आरती : तू मला म्हणाला होतास कि तुला आत्मे दिसतात... तर हे सर्व कसं सुरु झालं ? आणि तुला भीती नाही वाटत ?

संकेत : मी साधारण ६-७ मध्ये असताना शाळेमधून कॅम्प ला गेलो होतो.. तिथे २ दिवस राहायचे होते.. कॅम्प एका गावातच होता.. आणि आम्ही एका शाळेमध्ये थांबलो होतो.. तेव्हा एका रात्री आमचे जेवण झाल्यानंतर मी बाथरूमला जाण्यासाठी एकटाच बाहेर पडलो... त्यावेळी एका झाडाखाली एक बाई पांढऱ्या वेशात बसलेली मी पहिली.. ति माझ्याकडे पाठ करून बसली होती आणि चेहऱ्यावर दोन्ही हात ठेऊन ढसा ढसा रडत होती.. मला तिची दया आली म्हणून मी तिच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि तिच्या डोक्याला हात लावून तिला म्हटले “काकी रडू नका ? का रडताय तुम्ही?” तेव्हा त्या बाई ने वर पहिले आणि  जे मी पहिले ते पाहून मी जोरात किंचाळलो आणि तिथेच बेशुध्द झालो..

आरती (घाबरून) : काय पाहिलेस तू ?

संकेत : त्या बाई ला दोन्ही डोळे नव्हते पण तरीही तिच्या डोळ्यातून रक्त वाहत होते...

आरती (जास्त घाबरून) : oh my god ????????? मग?

संकेत : मग काय.. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी घरी होतो.. शुद्धीवर आल्यावर मी सर्वांना घडलेल्या गोष्टीबद्दल सांगितले.. सुरुवातीला कोणाचा विश्वास बसेना.. पण नंतर त्या गावी चौकशी केली असता असे समजले कि फार वर्षापूर्वी त्या गावात एका बाईचे डोळे फोडून तिला ठार केले होते आणि अजूनही कधीतरी तिचा आत्मा लोकांना दिसतो.. मग काय तेव्हा पासून जे सुरु झालं ते आजपर्यंत तसेच आहे.. खूप पूजा अर्चा झाल्या, देव देवता झाले, मंदिर फिरलो पण उपाय काहीच झाला नाही.. मग एका paranormal expert ने सांगितले कि हि मला देणगी आहे आणि तिचा वापर करून त्या लोकांची मदत कर.. त्यांच्या इच्छा पूर्ण कर.. तेव्हा पासून आतापर्यंत हेच करतोय..

आरती सर्व ऐकून अगदी थक्क झाली होती..

आरती : my god.. so scary यार.. hats off to you..

संकेत (हसत) : thank you...

संपूर्ण प्रवासात त्यांच्या गप्पा अशाच चालू होत्या.. संकेत ने आरतीच्या कुटुंबा-बद्दल सर्व जाणून घेतले, स्वतःबद्दल सर्व माहिती दिली..

संकेत : लक्षात ठेव.. आपण एकत्र काम करत होतो..

(संकेत चे बोलणे अर्ध्यावर तोडत आरती म्हणाली..)

आरती : हो बाबा लक्षात आहे.. चौघेच जन तर आहेत.. सांभाळून घेईन मी..

संकेत : madam अशा गैरसमजात राहू नका.. कदाचित माझी भावंडे सुद्धा येणार आहेत.. म्हणजे तसे आम्ही दरवर्षी plan करूनच एकत्र गावी येतो पण यंदा कोणालाच सुट्टी नाही आहे त्यामुळे यावर्षी फक्त मीच.. पण त्यांचा काही भरवसा नसतो... मूड झाला कि नोकरी वैगरे बघणार नाहीत आणि तसेच गावी येतील... खूप धमाल असते जेव्हा आम्ही सर्व एकत्र असतो.. बाकी कोणी नाही आले तरी माझा भाऊ सिद्धेश नक्की येईल.. माझ्या ५ no काकांचा मुलगा.. त्याची काळजी करू नकोस.. तो जर असला तर मी त्याला खर काय ते सांगेन.. आमच्या भावंडांमध्ये असं सर्व चालत..

आरती : अच्छा.. चालेल..

गप्पांच्या ओघात आपण केव्हा गावी पोचलो त्यांना देखील कळले नाही.. पावसामुळे गाव अगदी प्रफुल्लीत झाले होते.. ओलेचिंब रस्ते.. लाल मातीचा सुगंध.. ओसंडून वाहणाऱ्या नद्या.. काळ्या काळ्या ढगांनी भरलेले आभाळ.. कोसळणाऱ्या सरींवर सरी.. कडाडणाऱ्या विजा.. झाडांवरील पाखरांचे थवे.. डोंगर दऱ्यातून वाहणारे सुंदर धबधबे.. धुंद करणारा गार वारा आणि त्यामुळे अंगावर येणारा कोवळा शहारा.. त्या वाऱ्यासोबत डोलणारी झाडे.. पाना-फुलांवरील पाण्याचे टपोरे थेंब.. शेतातील धान्यासाठी लावणी करणारे शेतकरी.. पावसाचा मनसोक्त आनंद लुटणारी लहान मुले.. या रिमझिम पाऊसधारांमुळे वातावरण अगदी तन मन फुलवणार होतं.. पावसामुळे गावाचे रूप अगदी मोहक झाले होते.. सृष्टी अगदी बहरली होती..

निसर्गाचे ते भव्य रूप पाहून आरती अगदी थक्क झाली होती.. तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहून संकेत ने तिला विचारले “काय? कसा वाटला गाव माझा..?”

आरती : अप्रतिम.. no words.. निसर्गाच इतकं भन्नाट सौंदर्य मी यापूर्वी कधीच पाहिलेलं नव्हतं.. आता मला कळल कि पावसाळ्यात कोकणाला स्वर्ग का म्हणतात.. किती शांत आणि प्रसन्न वाटत आहे इथे..

संकेत : म्हणूनच आणले आहे तुला.. संपूर्ण एक महिना आपल्याला या निसर्गाच्या सहवासात घालवायचा आहे.. be ready..

आरती : नक्कीच..

पावसाची रिमझिम अजुनही चालूच होती.. दोघे कसे बसे गाडीतून उतरले आणि सामान घेऊन घराच्या दिशेने निघाले.. आरती मात्र पावसाळ्यातील कौलारू घरे पाहण्यात अगदी मग्न होऊन गेली होती.. आता finally दोघेही घरी आले.. सर्व जन त्यांचीच वाट पाहत बसले होते..

आई : इलास.. बगेतले कपडे बिजले नाय ना ?

संकेत : नाही ग..

दोघेही आत गेले.. आत गेल्या गेल्या संकेत ने आरतीची सर्वांशी ओळख करून दिली..

पप्पा : आरतीचा आडनाव काय ?

आरती : देशपांडे.. मी पुण्याला असते.. नोकरीसाठी फक्त मुंबई..

काका : मालवणी कळत का तुला ??

आरती (थोडी घाबरूनच) : थोडं फार..

संकेत (मनातल्या मनात) : झाले यांचे प्रश्न सुरु.. तिला श्वास तरी घेऊ द्या..

काकी : त्येका पाणी बिनी तरी पिऊक देवा.. इल्या इल्या काय विचारतास तिका ?

संकेत (मनातल्या मनात) : नशीब काकीला तरी समजलं..

पप्पा (हसत) : आमका वाटला संकेतान सून आणल्यान कि काय आमच्यासाठी..
संकेत : अहो मैत्रीण आहे..

संकेत आरतीकडे कडे पाहत तिला म्हणाला “तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस.. त्यांना सवय आहे मस्करी करायची.. तू जा आत आणि कपडे change करून घे..”

आरती काकीसोबत निघून गेल्यावर इथे काका आणि पप्पांनी मुंबई बद्दल विचारपूस करण्यास सुरुवात केली.. त्यांच्या बोलण्यातून समजले कि सिद्धू सुद्धा काल आला आहे..

संकेत : सिद्धू गेलाय कुठे ?

पप्पा : माशे पकडूक गेलेलो.. हे काय आताच माशे देऊन गेलो.. परत खय गेलो काय माहित नाय..

काका : आसात हय खय तरी..

पप्पा : जेउच्या टायमाक बरोबर येतलो..

तेव्हढ्यात सिद्धू तिथे धडकला..

काका : ह्यो काय इलो.. खय हुतं रे ?

सिद्धू : खय नाय.. हयसरच हुतंय तावड्यांकडे..

संकेत ला पाहिल्यावर त्याने म्हटले “तू कधी आलास?”

संकेत : हे काय आताच.. १५ मिनिटं झाली..

बोलता बोलता संकेत सिद्धू ला एकांतात घेऊन गेला..

सिद्धू : ती आली आहे काय ?

संकेत : हो रे.. बर झालं तू आलास.. आता दोघे मिळून सांभाळून घेऊ..

सिद्धू : आहे कुठे ती ?

संकेत : अरे आत आहे.. change करतेय..

सिद्धू : पप्पांना doubt वैगरे नाही ना आला ?

संकेत : अजून तरी काही नाही.. एव्हढे प्रश्न अजून काही विचारले नाही आहेत..

सिद्धू : हम्म.. चल बघू नंतर..

दुपारी जेवल्यानंतर सर्व पुरुष मंडळी आराम करू लागली.. संकेत ला काही केल्या झोप येईना.. कारण काकी आणि आई सोबत आरती भांडी घासण्यासाठी गेली होती... तेव्हा तिला काही विचारले तर नसेल ना ?? आरती घाबरली तर नसेल ना ? या विचाराने संकेतचे चित्त थाऱ्यावर नव्हते.. पण त्याच विचारात त्याला झोप केव्हा लागली कळलेच नाही.. जाग आली ती पप्पांच्या हाकेनेच.. आणि समोर आरती पप्पा आणि काकांना चहा देत होती.. सर्व अगदी व्यवस्थित आहे असे पाहिल्यावर संकेतला देखील हायसे वाटले.. तो दिवस अगदी मजेत निघून गेला.. कारण आरतीला काही विचारण्यासाठी आरतीला कसली फुरसत असेल तर शप्पथ.. रात्री तिने आई आणि काकीला स्वयंपाक करण्यास मदत केली होती.. शिवाय जेवण वाढण्यापासून ते ताट उचलेपर्यंत प्रत्येक काम ती आपलं समजून करत होती.. तिच्या कामाबद्दल आई आणि काकी सारखीच तिची स्तुती करत होती.. घरी येणारी गावातली मंडळी तर तिला संकेत ची बायको समजू लागत होते.. तशी पूर्वकल्पना संकेत ने आधीच आरतीला देऊन ठेवली होती..

असेच दिवसांमागून दिवस जात होते... आरतीचा दिनक्रम ठरलेलाच होता.. पण तरीही प्रत्येक गोष्टीमध्ये संकेत तिला नेहमीच मदत करत होता.. सकाळी विहिरीवर पाण्यासाठी जाणे.. दुपारचे जेवण.. त्यानंतर नदीवर कपडे धुण्यासाठी.. संध्याकाळी देवपूजा आणि पुन्हा रात्रीचे जेवण आणि भांडी घासून झाल्यानंतर रात्रीच्या गप्पा गोष्टी.. शिवाय कधीतरी आई आणि काकीसोबत शेतातील लावणी करण्यासाठी जाणे तसेच कधीतरी शेण सारवणे.. किंवा काका, सिद्धू आणि संकेत सोबत मासे पकडण्यासाठी जाणे.. या सर्व गोष्टी करता करता आरती प्रत्येकाच्या खूप जवळ आली होती.. खूप नव्या गोष्टी शिकली होती.. आता तर गावातले प्रत्येक जन तिला चांगलेच ओळखू लागले होते.. संकेत च्या वडिलांकडून ती नेहमीच भुतांच्या गोष्टी ऐकण्यासाठी जात असे.. संकेत रोज हे सर्व पाहत असे.. आता तर त्याने आरतीला सूचना करायचे देखील सोडले होते.. संकेत जवळ नसताना त्याची आई किंवा काकी नेहमी संकेत बद्दल काही ना काही आरती ला सांगत असे.. आरतीच्या मनात संकेत बद्दल आणखीनच respect वाढला होता.. इथे सुद्धा तो आरतीची फार काळजी घेत होता.. तिला काही हव नको याची विचारपूस करत होता.. या दिवसांमध्ये आरतीला संकेत खूप जवळचा वाटू लागला होता.. त्याच्याबद्दलच्या गोष्टी ऐकून ती आणखीनच त्याच्यात गुंतत चालली होती.. मनोमनी त्याच्या प्रेमातच पडली होती असं म्हणायला हरकत नव्हती..

एके दिवशी सिद्धू, संकेत आणि आरतीने वाड्याजवळ (जिथे गुरे ढोरे ठेवली जातात) जायचे ठरवले.. वाडा  घरापासून फारच दूर होता.. अगदी जंगलातच म्हणा.. आरतीची एक अट होती कि जर पाऊस नाही आला तरच ती वाड्याजवळ येणार.. तेव्हा संकेत ने तिला म्हटले होते कि “अग हा पाऊस एकदा अनुभवून तर बघ, नाही तो शहराचा पाऊस विसरलीस तर नाव नाही लावणार..” पण आरती मात्र आपल्या अटीवर अडून होती.. नाही म्हणजे नाहीच.. आणि तसेही सकाळपासून पावसाचे चिन्ह नव्हते.. त्यामुळे आरती येणार हे नक्की होत.. दुपारी जेवण वैगरे उरकून झाल्यावर ३ च्या सुमारास तिघेही निघाले.. १० मिनिटे चालल्यावर अचानक पावसाची लगबग सुरु होताना दिसली.. अचानक काळे ढग दाटून आले.. विजांचा चमचमाट सुरु झाला.. काळजात धडकी भरावी असा ढगांचा गडगडाट होऊ लागला.. आणि नाही म्हणता म्हणता सरींवर सरी कोसळू लागल्या.. तिघांपैकी फक्त आरतीने छत्री आणली होती.. बाकी संकेत आणि सिद्धू पावसाचा आनंद लुटण्यात दंग झाले.. मधेच आरतीला चिडवू लागले.. कारण नको असलेला पाऊस अचानक आल्यामुळे तिचा हिरमोड झाला होता.. आता तर असं वाटत होतं कि तो पाऊस देखील जणू तिला चिडवत होता.. आरतीने पुन्हा मागे जायचे म्हटल्यावर संकेत आणि सिद्धू तिला हसू लागले.. “जायचे आहे तर जा.. ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने जा” संकेत तिला चिडवत म्हणाला.. पण आरती ची एकट्याने मागे जायची काही हिंमत होत नव्हती.. पावसाचे ते रूप पाहून ती थोडीशी घाबरलीच होती..

संकेत : अग ऐक माझं.. ती छत्री बंद कर आणि एकदा मजा घेऊन तर बघ पावसाची.. इथे आपल्या शहरासारखं आजूबाजूला गाड्या नाहीत किंवा bulidings नाहीत.. बघ किती हिरवळ पसरली आहे.. ती नदी बघ.. उडणाऱ्या पक्षांचे थवे बघ.. वाऱ्यासोबत डोलणारी ती झाडं बघ.. इतकं सर्व असताना तू त्या छत्री मध्ये काय करत आहेस.. चल ये ना..

आरती : नाही ना..

आणि तेव्हढ्यात जोरात आलेल्या वाऱ्याने आरतीची छत्री उडून गेली.. वारा इतका जोरात होता कि छत्री फार दूर उडून गेली होती.. त्यामुळे पुन्हा तिच्या मागे न जाण्याचे आम्ही ठरवले..

आरती संकेत आणि सिद्धू कडे रागात पाहू लागली..

आरती : झालं तुमच्या मनासारखं ?

संकेत आणि सिद्धू सुद्धा निर्लज्जा सारखे मान डोलावून हसू लागले..

पुढे चालत गेल्यावर संकेत ने मागे वळून पहिले त्यावेळी त्याला जाणवले कि आरती अक्षरशः त्या पावसासोबत मिसळून गेली होती.. एकेकाळी आरेच्या जंगलात पावसामुळे कुडकुडत बसलेली ती आज त्या पावसामध्ये स्वच्छंद पणे बागडत होती..पावसाची भीती दूर करून बेधुंद आणि बेफिकीरपणे स्वतःला झोकून देत होती.. आज असं म्हणता येईल कि finally ती पावसाची झाली आहे.. पावसातील तिचे सौंदर्य संकेत न्याहाळत बसला.. ओलेचिंब केस.. चेहऱ्यावर आलेली केसांची लट.. पापाण्यांवरील पाण्याचे थेंब.. थरथरणारे गुलाबी ओठ.. त्या हिरव्या वातावरणात ती परी लाजवाब वाटत होती..

खूप अशा गोष्टी आरतीला मागताच मिळत गेल्या.. आणि त्यासाठी ती नेहमीच संकेत चे आभार मानत होती.. इथे संकेत देखील तीचा सारखा विचार करू लागला “अशीच तर बायको मला हवी होती.. काय हरकत आहे आरती ला विचारायला.. तसेही घरातले सर्व तिला पसंत करतच आहेत..”

त्यातच एक दिवस संकेतच्या पप्पांनी आरतीला बोलावून घेतले आणि तिला विचारले कि “तुझ्यात आणि संकेत मध्ये काही नाही आहे ना ?” अचानक विचारलेल्या त्या प्रश्नामुळे आरती अगदी गोंधळून गेली.. काय उत्तर द्यावे तिला काही समजेना.. प्रेम तर ती करत होती पण संकेत तिच्यावर प्रेम करतो का याबद्दल तिला खात्री नव्हती.. त्यामुळे तिने सरळ नाही म्हणून सांगितले..

पप्पा : काही असेल तर सांगा..                          

आरती : नाही काका असं काही नाही आहे.. आम्ही खूप चांगले मित्र आहोत बस..

पप्पा : अच्छा.. बर मग हा फोटो बघ.. आम्ही संकेत साठी हि मुलगी पहिली आहे.. खूपच सोज्ज्वळ पोरगी आहे.. संकेत च्या आईची आणि माझी इच्छा आहे कि संकेत ने या मुलीशी लग्न करावे.. तू त्याची चांगली मैत्रीण आहेस.. तू विचारून बघतेस का जरा.. कारण आमच तर तो काही ऐकणार नाही आहे..

पप्पांच्या बोलण्यावर आरतीने लगेचच होकार देऊन टाकला.. पण मनोमनी ती अक्षरश: कोसळली होती.. पुन्हा तिच्या वाट्याचे प्रेम तिला मिळाले नव्हते.. तिने स्वतःला सावरले आणि लगेचच ती संकेतला जाऊन भेटली.. इथे संकेतही तिलाच शोधत होता..

संकेत : अग मी तुलाच शोधात होतो.. बर झालं भेटलीस.. मला तुला काहीतरी सांगायचं आहे..

आरती : मला सुद्धा तुला काहीतरी सांगायचे आहे.. आपण एखाद्या शांत ठिकाणी जाऊया ?

संकेत तिला शेताजवळून वाहणाऱ्या एका नदीजवळ घेऊन आला.. प्रसन्न करणारी ती जागा होती..

आरती : संकेत.. आई बाबांनी तुझ्यासाठी एक छानशी मुलगी पहिली आहे.. आणि त्यांची खूप इच्छा आहे रे कि तू तिच्याशी लग्न करावस..

संकेत : अग ते त्याचं नेहमीच आहे.. तू नको काळजी करूस..

आरती : नाही संकेत.. हि फक्त त्यांचीच इच्छा नाही तर माझीही इच्छा आहे कि तू तिच्याशी लग्न करावस.. मला ती मुलगी आवडली आहे आणि तुला शोभेल अशीच आहे ती..

संकेत : अग पण माझा तरी विचार करा.. मला आवडेल कि नाही हे तरी बघा आणि मग ठरवा..

आरती : संकेत जी चूक मी केली ती तू नको करूस plss.. मी खूप त्रास दिलाय माझ्या आई बाबांना.. तू असं नको करूस.. खूप जीव आहे त्यांचा तुझ्यावर.. आणि तुझ्या भल्यासाठीच करत आहेत ते सगळं..

आरतीच बोलण ऐकताच संकेतचा स्वतःच्या मनावरील ताबा सुटला आणि त्याने आरतीला स्वतःच्या प्रेमाची कबुली दिली..

संकेत : आरती मी तुझ्यावर प्रेम करतो ग.. आणि मला तुझ्याशीच लग्न करायला आवडेल..

आरती मनोमनी खूप खुश झाली होती पण संकेतच्या आई वडिलांसाठी तिने स्वतःच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव न आणता आणि स्वतःच्या भावना ताब्यात ठेवून खडसावुनच संकेतला म्हटले “हे बघ संकेत.. मी एकदा या प्रेमाचा वाईट अनुभव घेतला आहे.. पुन्हा मला या गोष्टी नको आहेत.. तू माझा विचार सोडून दे आणि आपल्या आई बाबांचा जास्त विचार कर असं मला वाटत..करशील ना रे.. माझी शेवटची इच्छा समज.. ती जर पूर्ण नाही केलीस तर मीही तुला मेल्यानंतर दिसत राहीन..” असं म्हणताना आरतीच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या..

पुढे संकेत काही बोलणार इतक्यात आरतीच त्याला म्हणाली “चल आता आपण निघूया का ? आणखी एक request आहे संकेत”

संकेत (उदास स्वरात) : काय?

आरती : उद्या आपण निघूया का ? मला पुण्याला माझ्या घरी जायचे आहे.. मला सोडायला येशील का?

संकेत : ठीक आहे..

घरी गेल्यावर संकेत ने उद्या निघणार असल्याचे सांगितले... सुट्टी संपायच्या आधीच निघणार म्हटल्यावर घरातल्यांनी कारण विचारले असता, सुट्टी रद्द झाल्याचे संकेत ने त्यांना सांगितले.. रात्री सर्व सामान वैगरे बांधून दुसऱ्या दिवशी दुपारी निघायचे ठरले.. सकाळी अंघोळ वैगरे उरकून झाल्यावर निघायची वेळ झाली तेव्हा आई आणि काकीला मिठी मारून आरती ढसा ढसा रडू लागली.. त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल तिने सर्वांचे मनापासून आभार मानले.. आणि मनात नसून सुद्धा सर्वांचा निरोप घेतला..

पुण्याला जाते वेळी दोघेही गाडीत अगदी शांतच होते.. ती जीवघेणी शांतता सहन न झाल्याने आरतीनेच म्हटले “तू रागावला आहेस का ? काहीच बोलणार नाही आहेस का ?”

संकेत : आता तू स्वतःच सर्व ठरवलं आहेस तर मी काय बोलणार..

आरती : संकेत समजून घे ना..

संकेत : मला कोणाला समजून घायचे नाही आणि बोलायचे तर अजिबातच नाही..

संकेतचा मूड चांगला न वाटल्याने आरती ने देखील पुढे काहीच म्हटले नाही.. त्याचाच विचार करत आरती झोपी गेली.. जाग आली तेव्हा पुणे आलेलं होतं.. रात्रीचे ८ वाजले होते आणि गाडी देखील तिच्या घरा शेजारीच उभी केली होती..

आरती : कधी पोचलो आपण ?

संकेत : आताच पोचलो..

आरती : मला खूप भीती वाटत आहे रे.. पप्पा कसे react होतील रे?

संकेत : मी आहे ना सोबत.. काही नाही होणार.. चल..

दोघेही घराच्या दिशेने चालू लागले.. आरती खूपच घाबरली होती..

घराची बेल वाजवली..

दार तिच्या बाबांनीच उघडला.. आरतीला पाहिल्याबरोबर त्यांनी दार तसाच बंद केला..

आरती (रडत) : पप्पा ऐकून तर घ्या.. मला काहीतरी सांगायचं आहे.. मला माफ करा.. पण माझं थोडं ऐकून तर घ्या ना..

पप्पा : चालती हो इथून नाही तर मला पोलिसांना बोलवावे लागेल..

आरतीचा आवाज ऐकून आरतीची आई दार उघडण्यासाठी जाऊ लागली तर आरतीच्या बाबांनी आरतीच्या आईच्या थोबाडीत मारत म्हटले “खबरदार जर तिला घरात घेतलेस तर.. तुला सुद्धा घराबाहेर काढेन..”

आरतीची आई (रडतच) : हा काढा.. सर्वांना घराबाहेर काढा आणि तुम्हीच बसा एकटेच.. स्वतःच्या बहिणीमुळे तुम्ही सर्वांना त्रास देत आलात.. अजूनही द्या.. तुमच्या अशा वागण्यामुळे तुमच्या मोठ्या मुलीने पळून लग्न केले... आरतीने सुद्धा तेच केले.. आणि छोटी सुद्धा तेच करणार.. तुम्हाला वाटायचे तुमच्या प्रेमापोटी त्या तुमचं सर्व ऐकतात.. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल नेहमी भीतीच होती.. प्रेम तर कधी निर्माणच नाही झाले.. तुमच्यामुळेच... तुमची बहिण तसं वागली म्हणून तुमच्या मुली देखील तशा वागतील याच गैरसमजात तुम्ही राहिलात.. अहो कधीतरी त्यांना प्रेमाने काही समजावले होते का तुम्ही.. तसं केलं असतं तर आज हि वेळ नसती आली..

बहिणीचे नाव काढल्यावर आरतीचे बाबा अगदी स्तब्ध होऊन गेले.. आणि सोफ्यावर शांत बसून राहिले..

आरतीच्या आईने दार उघडून संकेत आणि आरती ला घरात घेतले.. आरतीने अगदी कडकडून आईला मिठी मारली आणि दोघी मायलेकी रडू लागल्या...

लहान बहिण बाहेर गेल्यामुळे ती घरी नव्हती..

काहीवेळानंतर आईने संकेत आणि आरतीला बेडरूम मध्ये नेले.. तिथे गेल्यावर आईने संकेतला म्हटले “तुम्ही बसा जावई बापू मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते..”

संकेत : अहो आई मी तुमचा जावई नाही आहे.. मी आरतीचा मित्र आहे..

आई : म्हणजे ?

त्यावर आरतीने घडलेली सर्व हकीकत सांगितली.. आरतीसाठी केलेल्या मदतीसाठी आईने संकेत चे खूप आभार मानले...

संकेत : आभार कसले मानत आहात.. मला वाटलं म्हणून मी केलं..

आई : पण कोण करतं रे आजकाल.. तू होतास म्हणून माझी आरती आज सुरक्षित आहे.. तुझे आभार मानावे तितके कमीच आहेत..

संकेत : असू द्या हो.. मी निघतो आता..

आरती (उदास स्वरात) : निघतोयस ?

संकेत : हो.. उद्यापासून पुन्हा office join करेन..

आरती : I am sorry.. माझ्यामुळे तुला तुझी सुट्टी एन्जोय नाही करता आली.. really sorry..

संकेत : नाही ग.. उलट खूप मजा केली गावी.. नको sorry बोलूस..

आरती संकेतला बाहेर सोडण्यासाठी आली होती..

संकेत : आरती.. पुन्हा एकदा विचार कर ना ग.. pls..

आरती : मी सर्व विचार केला आहे संकेत... तुझे उपकार मी या जन्मी तरी विसरू नाही शकणार रे.. thank you very very much for all the lovely memories.. खूप काही केले आहेस तू माझ्यासाठी.. आई बाबांना खूप खुश ठेव.. त्यांना कधीच दुखावू नकोस.. पुन्हा भेटू तुझ्या लग्नात.. बोलवशील ना रे..?

संकेत (रागातच) : मी निघतो..

असं म्हणून संकेत निघून गेला.. इथे आरती धावत रडतच बेडरूम मध्ये गेली.. आरतीला रडताना पाहून आईने तिला म्हटले “संकेत आवडतो ना तुला ?”

आरतीने रडतच आईला जोरात मिठी मारली “हो ग.. खूप प्रेम करते मी त्याच्यावर.. खूप प्रेम करते.. नाही राहू शकत मी त्याच्याशिवाय..”

आई : मग सांगितलेस का नाही त्याला?

आरती : कारण त्याच्या आई बाबांनी आधीच त्याच्यासाठी हवी तशी मुलगी शोधून ठेवली आहे..

आरती अजूनच हुंदके देऊन रडू लागली..

आईने तिला सांभाळत म्हटले “जाऊदे रडू नकोस.. नशीब असतं ग एकेकाच..”

आरती : पण माझ्याच बाबतीत का ग असं होतं ? मी कधीच कोणाचा वाईट विचार नाही केला.. मग का असं?

इतक्या वेळ दारा आड उभे राहून ऐकत असणारे तिचे बाबा आत आले..

दोघी माय लेकी त्यांना पाहून शांत झाल्या..

बाबा : त्यावेळी मी लहान होतो आणि माझी ताई college मध्ये होती.. माझ्या बाबांना गावात खूप मान होता.. माझ्या ताईचा माझ्यावर खूप जीव होता.. आई लहानपणीच गेल्यामुळे ताईच माझा सांभाळ करत होती.. एक दिवस तिने मला तिच्या प्रेमाबद्दल सांगितलं.. ती एका मुलावर जीवापाड प्रेम करत होती.. मला सुद्धा जेव्हा ती हे सर्व सांगायची तेव्हा फार मजा वाटायची.. पण एक दिवस मी ताई ला एकट रडताना पाहिलं.. मी जाऊन तिला रडण्याचे कारण विचारले असता तिने मिठीत घेतले आणि आणखीनच जोर जोरात रडू लागली.. रडत रडत ती मला एकच गोष्ट सांगू लागली “हि प्रेम फार वाईट गोष्ट आहे.. कधीच तिला जवळ येऊ देऊ नकोस..” ताईचे ते शब्द नेहमी माझ्या कानात गुंजत असतात..

दुसऱ्या दिवशी माझ्या ताईचे प्रेत एका नदीजवळ सापडलं.. गावातली लोकं तिच्याबद्दल खूप वाईट साईट बोलू लागले होते.. मला काहीच कळत नव्हते.. ताईने असे का केले?

त्यानंतर मी आणि बाबांनी तो गाव सोडला आणि पुण्याला येऊन राहू लागलो.. थोडी समज आल्यावर मी बाबांना ताई बद्दल विचारले असता असे समजले कि ज्या मुलावर ती जीवापाड प्रेम करत होती तो तिला लग्नाआधीच गरोदर करून पळून गेला होता.. आणि बाबांच्या भीती पोटी तिने नदीत उडी मारून जीव दिला होता..

आरती आणि तिची आई दोघेही तिच्या बाबांकडे पहातच राहिले.. काय बोलावे काहीच सुचेना..

बाबा : माझ्यामुळे आधीच तुझे खूप नुकसान झाले आहे.. यापुढे मी कधीच असे होऊ देणार नाही.. संकेतवर तुझं प्रेम आहे ना?

आरती : हो बाबा..

बाबा : मग जा त्याच्या जवळ आणि त्याला सरळ सांगून टाक.. मी आहे तुझ्यासोबत.. तुझं लग्न त्याच्याशी लावून द्यायची जबाबदारी माझी..

आरती : पण बाबा.. त्याच्या आई वडिलांनी आधीच त्याच्यासाठी मुलगी पहिली आहे..

बाबा : मला सांग.. संकेत खुश राहील का त्या मुलीसोबत ?

आरतीने मान हलवून नकार दिला..

बाबा : तू राहशील का त्याच्याशिवाय?

आरती : अजिबात नाही बाबा..

बाबा : मग विचार कर.. अशाने तुम्हा तिघांची आयुष्य बरबाद नाही का होणार.. तुझं, संकेतच आणि त्या मुलीचं.. जा संकेत जवळ.. सांगून टाक त्याला..

बाबांचं बोलणं पटल्याने तिने ताबडतोब बाबांना मिठी मारली आणि तशीच mobile घेऊन बाहेर पळत सुटली.. तेव्हा वाटेतच तिची बहिण तिला भेटली.. आरतीला पाहून खूप खुश होऊन ती म्हणाली “ताई.. तू कधी आलीस..?”

आरतीने बहिणीच्या गालावर किस करत तिला म्हटले “श्रेया मी नंतर भेटते तुला.. bye..”

आरती तशीच वेगात घराबाहेर पडली..

इथे संकेत गाडी घेऊन सरळ आरे च्या जंगलात आला.. रात्रीचे ११.४६ झाले होते.. पावसाची रिमिझीम चालूच होती.. संकेत रोजच्या सवयीप्रमाणे बाळ्या च्या दुकानात जाऊन दुध पिऊ लागला.. काहीवेळा नंतर त्याची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकड्यावर गेली.. तिथे एक मुलगी पांढऱ्या वेशात.. चेहऱ्यावर हात ठेऊन रडत होती.. संकेतला ती आकृती ओळखीची वाटली म्हणून तो तिच्या जवळ जाणार इतक्यात त्याचा फोन वाजला.. फोन आरतीचा होता..

संकेतने फोन उचलला आणि समोरून रडण्याचा आवाज येऊ लागला..

संकेत : हेल्लो.. आरती?? हेल्लो ?? अग रडतेयस का ?? आरती ?

समोरून श्रेया बोलू लागली “हेल्लो संकेत... संकेत.. आरतीचा accident झाला.. आणि..”

(श्रेया पुढे काय बोलणार इतक्यात संकेत म्हणाला)

संकेत (घाबरून ): कसा काय?

श्रेया : तू निघून गेल्यावर.. बाबांनी तुमच्या प्रेमाला होकार देऊन तिला तुझ्याजवळ जाण्यास सांगितले.. आनंदाच्या भरात ती तुझ्याजवळ येण्यासाठी धावतच सुटली.. आणि रस्त्यावर आल्यावर तुला फोन करण्याच्या नादात एका भरधाव truck ने तिला उडवले रे.. हॉस्पिटल मध्ये नेतेवेळी तिने मला सांगितले कि ती तुझ्यावर खुप खूप प्रेम करते.. तुझ्याशी लग्न करायची तिची इच्छा अपुरी राहिली.. शेवटच्या क्षणी

​​ति म्हणत होती कि ती तुला भेटायला येत आहे.. आणि तिने जीव सोडला रे..
(श्रेया हुंदके देत रडू लागली )

ते ऐकून संकेतच्या हातामधला mobile खाली पडला.. आणि त्याची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकड्यावर बसलेल्या त्या मुलीकडे गेली.. तेव्हा आरतीचा आत्मा भरलेल्या डोळ्यांनी आणि चेहऱ्यावर हास्य ठेऊन संकेत कडे पाहत होता.. संकेत तिच्या जवळ जाणार इतक्यातच आरतीचा आत्मा अंधारात अगदी गुडूप होऊन गेला..

आणि इथे संकेत भर पावसात अगदी कोसळून पडला.. त्याचे अश्रू अनावर झाले..

आज संकेत आपल्या बायकोसोबत खुश आहे.. पण एका आशेवर तो अजूनही आहे कि पुन्हा पावसातील ती कधीतरी दिसेल..

​                                                               ​!!..समाप्त..!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पावसातील ती..

ghodkepunjaram

खुप छान  कथा  आहे.

On Oct 30, 2014 3:56 PM, "संकेत सावंत [via ई-साहित्य]" <[hidden email]> wrote:

If you reply to this email, your message will be added to the discussion below:
...
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पावसातील ती..

संकेत सावंत
आभारी आहे
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पावसातील ती..

विवेक वाटवे
संकेतजी,

अतिशय सुंदर कथा. मला खूप आवडली.
कथा मस्त ओघवती आहे.
कथानकातील शेवटच्या घडामोडींमुळे छान Twist आला आहे.
अप्रतिम!
असेच सुंदर सुंदर लिहीत रहा. पुढील सर्व लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा!
-विवेक वाटवे
vrvatve@rediffmail.com
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पावसातील ती..

संकेत सावंत
​आभारी आहे विवेक सर… ​