अमेय घरत... ग्रे आकाशातील शुक्रतारा!

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

अमेय घरत... ग्रे आकाशातील शुक्रतारा!

मैत्रायण
अमेय घरत... ग्रे आकाशातील शुक्रतारा!
 शब्दांच्या पलीकडले काय असत?... बरेच काही! त्या सर्व भाव-भावनांना एकत्र आणून शब्दात आणि तेही बहुभाषिक शब्दात गुंफणे आणि जाहिरातीसाठी त्याचा परिणामकारक उपयोग करणे हे फक्त त्यालाच जमते जो मनापासून शब्दांवर आणि माणसांवरही प्रेम करतो.
 
परमेश्वर हा लहरी चित्रकार असावा म्हणून कधी कधी तो अमेय सारखी चित्र मन लाऊन काढतो अन्यथा माझ्यासारख व्यंगचित्रे काढणे हा त्याचा आवडता छंद. सूर्य आणि चंद्र कधी एकत्र येत नाही म्हणतात. एक उगवतो तेव्हा दुसरा मावळतो. पण अमेयाच्या बाबतीत परमेश्वराने हे हि डावलायचे ठरवलेले दिसत. आड म्हणून तर त्याच्या डोळ्यात दिसते चांदणे आणि चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचा सूर्य. जाहिरातचा धंदा तेजीत असल्याने कदाचित परमेश्वराने त्यात उतरायचे ठरवून आपले मास्टर पिसेस पृथ्वीवर पाठवाचे म्हणून अमेयला पाठवले असावे. पण अमेय म्हणजे नुसतीच जाहिरात नव्हे तर शत प्रतिशत सत्यही. भाषेवरचे त्याचे प्रेम हे एक व्रत आहे. त्यासाठी साहित्याच्या कित्येक प्रांतात त्यांनी शिलेदारी केली आहे. कविता, एकांकिका, जिंगल्स, कथा, लेख अशा अनेक प्रकारांवर आपली अमेय मुद्रा त्यांनी उमटवली आहे.
 
कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक येथिल कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या "नातवांच्या कविता" या कार्यक्रमात सहा नातवांपैकी एक नातू म्हणून त्याने स्वतःच्या कविता सादर केल्या. अभिनय हे ह्याचे दुसरे वेड. देवेंद्र पेम सारख्या सुप्रसिद्ध रंगाकार्मिंकडे ह्यांनी अभिनयाचे धडे घेतले आहेत. भविष्यात एक स्वनिल डोळ्यांचा आणि खुबसुरत चेहऱ्याचा अभिनेता मराठी रंगभूमीवर अथवा टीव्हीवर दिसेल. फोटोग्राफी हा ही त्याचा आवडता छंद. जाहिरातीच्या चंदेरी दुनयेत राहूनही हा युवक जमिनीवर पाय घट्ट रोऊन उभा आहे. 'माणूस' हा ह्याचा आवडता विषय. "विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा." माणसांच्या संगतीत राहून त्यांचे आगळेवेगळेपण हा शोधतो आहे.
 
आत्मा हे परमात्म्याचे रूप आहे हे ह्याला तरुण वयातही कळले आणि त्याची अनभूती अध्यात्म्याच्या वाटेवर ह्याला येत असते. अध्यात्मिक अनुभूतीला वयाचे बंधन नसते हेच खरे!

अमेय, तुझ्याच शब्दांत सांगायचे झाले तर "चालण्याची दिशा बदलताच डावे उजवे आपोआप बदलते आणि डोईवर केवळ 'ग्रे' आकाश उरते!"
 
खर आहे, पण माझ्यासाठी त्या आकाशात एक तेजस्वी शुक्रताराही लुकलुकतो आहे... अमेय!