समतेचा वारा

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

समतेचा वारा

संतोष बोंगाळे
समतेचा वारा

आश्वासनांची केली खैरात
एकही न पाळले कोणी
कित्येकाने प्राण सोडले
मिळाले न घोटभर पाणी

निवडून सर्वांनी दिले ज्यांना
त्यांनीच लुबाडले आम्हा
फिरून तेच आले दारात
मतांची भीक मागायला पुन्हा

येथे नावालाच लोकशाही
हुकुमशाही राजरोस नांदते
महासत्तेच्या नावाखाली
पुढाऱ्यांचेच घर भरते

मायबाप विचार करा खरा
भ्रष्टाचाराला देऊ नका थारा
मतदार तत्वनिष्ठ राहील तर
समतेचा वाहील वारा

- संतोष बोंगाळे
मु. पो . पिंपळखुंटे ता . माढा
जि . सोलापूर ४१३२०८
भ्रमणध्वनी – ९९२३९००८४०
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: समतेचा वारा

शशिकांत ओक
"निवडून सर्वांनी दिले ज्यांना
त्यांनीच लुबाडले आम्हा
फिरून तेच आले दारात
मतांची भीक मागायला पुन्हा ..."

आता काळ बदलला... वारा आता नमुन गेला... मित्रांनो, चला करू समतेच्या गोष्टी ... राष्ट्र बांधणीच्या कामाला