यंत्रांच्या राज्यात

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

यंत्रांच्या राज्यात

nilesh dattaram bamne
यंत्रांच्या राज्यात
वाटले नव्ह्ते मला परतावे लागेल पुन्हा यत्रांच्या राज्यात
आणि यंत्रांवर स्वार होण्यासाठी हातात धरावी लागतील शस्त्राप्रमाणे पुन्हा तीच यांत्रिक साधने...
वाटले नव्ह्ते मला अंगावर चढवावा लागेल पुन्हा तोच मळ्कट पोशाख ग्रीसने माखलेला  आणि माझ्या अंगावर चढवलेले पां॑ढरे शुभ्र कपडे उतरवून ठेवावे लागतील कायमचे...
वाटले नव्ह्ते मला कित्येक दिवस माणसांच्या समस्या सोड्विण्यात मग्न असणारा माझा मेंदू आता पुन्हा गुतून पडेल यंत्रांच्या वेगात आणि त्यांच्या कर्णकर्कश आवाजात स्वच्छेने...
वाटले नव्ह्ते मला आता माझ्या सभोवताळ्ची निरव शांतता भंग होऊन माझ्या मेंदुतील घोडे प्रचंड वेगाने धावू लागतील काही तरी निर्माण करण्यासाठी नव-नवे...
कवी – निलेश बामणे ( एन.डी. )