|
खुर्चीसाठी काय पण...
खेळ रंगतो खो – खो चा राजकारणात
येता जवळ निवडणुक
राजकारणी धूर्त घेतो बांधून
गाठोडे तत्वांचेच डोक्यावर
पाऊस पडतो आश्वासनांचा सर्वत्र
धुण्यासाठी राजकारण्यांचे हात
वर्षानुवर्षे म्ह्णत असतो जनतेस
राजकारणी तुमच्यासाठी काय पण
खुर्ची सरकताना दिसली बुडाखालून
की म्ह्णतो आता खुर्चीसाठी काय पण
कवी- निलेश बामणे.
|