आठवण येते

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आठवण येते

nilesh dattaram bamne
आठवण येते

एकांतात मी असताना मला तुझी आठवण येते
तुझ्यासाठी वाया घालविलेल्या दिवसांची आठवण येते
तुझ्या गुलाबी गालावरील काळ्या तिळाची आठवण येते
तुला पटविण्यासाठी पटविलेल्या तुझ्या मैत्रिणीची आठवण येते
तुझ्यामुळे मी नाकारलेल्या त्या कित्येक सुंदर तरुणींची आठवण येते
तुझ्यासाठी केलेल्या त्या कित्येक नाटकांची आठवण येते
तुझ्यावर जबरदस्ती लिहिलेल्या त्या कवितांची आठवण येते
शेवटी शेवटी तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी दिसलेल्या नकाराची आठवण येते
तुझ्या आठवणीत गाळलेल्या प्रत्येक अश्रुची आठवण येते
आता तर मी तुझ्या प्रेमात पडलो होतो हे आठवून स्वत:वरच हसू येते

कवी - निलेश बामणे
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आठवण येते

RAJ BHAGWAT
NILESH KHAROKHARACH APRATIM.

GOD BLESS YOU.

RAJ BHAGWAT.