नवीन वर्ष

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

नवीन वर्ष

nilesh dattaram bamne
नवीन वर्ष
ह्ळूच सरते एक वर्ष आपल्या जीवनातले एका मध्यरात्रीला
आणि उजाडते नवीन सकाळ पुन्हा घेऊन एक नवीन वर्ष स्वागताला...
निरर्थक या जगात जगलो आपण आणखी एक वर्ष
आता हा अनुभव आसतो आपल्या गाठीला...
प्रश्न पडतो काहींना करावा आनंद साजरा कसा
कमी झालेल्या आयुष्यातील एका वर्षाचा...
बेभरवश्याच्या जीवनात या आपण जगलो आणखी एक वर्ष पुर्ण
हा आनंद पुरेसा नाही का सरलेला वर्ष साजरा करण्याला...
मग ते वर्ष मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेतील
अथवा कोणत्याही जात- धर्मातील का असेना...
प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी नवीन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा मी देतो सर्वांना...
मला मिळालेल्या शुभेच्छा एका झोळीत जमा करून
ती झोळी मी टांगतो माझ्या खांद्याला...
पुढे वर्षभर आनंदाने त्यात प्रेमाची भर घालून
वाटतच राहतो इतरांना...
कवी- निलेश बामणे.