थंडी

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

थंडी

nilesh dattaram bamne
थंडी

उबदार घरातील उबदार अंथरुणावर

आरामात झोपलेल्यांसाठी थंडी असते गुलाबी ...उगड्यावर मोकळ्या आकाशाखाली जमिनीला अंथरून समजून

उशाला दगड घेऊन झोपणाऱ्यासाठी थंडी असते जीवघेणी...फार पूर्वी घरासमोरच्या मोकळ्या जागेत बोचऱ्या थंडीतही  

गुलाबी गप्पा मारत बसायचो अर्ध्या रात्रीपर्यंत

शेण्या , लाकड  , करवंट्या, कागद किंव्हा टायर  जाळून तयार झालेल्या

शेकोटी समोर तळहात एकमेकांवर  घासत

शीतल चांदण्याच्या प्रकाशात चंद्राला साक्षी ठेऊनी ...कित्येकाना थंडी वाटते वेदनादायक अंगादुखीमुळे

काहीना ओठ ,तळहात , पाय फुटल्यामुळे  किव्हा त्वचा कोरडी झाल्यामुळे ही ...उगाच म्हणतात थंडी गुलाबी असते काहींसाठी ती लाल पिवळी निळी

किंव्हा रंगीबेरंगी ही असू शकते इंद्रधनूष्यांसारखी ...पावसावर लिहिल्या गेल्या असतील लाखो कविता

पण थंडीवर शक्यता कमीच आहे इतक्या कविता लिहिल्या गेल्याची

थंडीवर लिहिल्या गेलेल्या कविताही थंडीवर कमी

आणि उष्ण पेयावर किंव्हा सृष्टीत व्यापून राहिलेल्या उष्णतेवरच

अधिक असतील नाही ...कवी - निलेश बामणे