रंग बदलणारे सरडे

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

रंग बदलणारे सरडे

nilesh dattaram bamne
रंग बदलणारे सरडेरंग बदलणाऱ्या त्या सरड्यालाही लाजवेल

इतके रंग बदलणारे काही सरडे

असतात माणसाच्याच रुपात .....

हे सरडे आपल्या सोबत कधी - कधी

मित्राच्या बुरख्यात वावरत असतात

आणि एक दिवस आपलाच घात करतात .....

आपल्या हितचिंतकाबद्दल आपलेच कान भरून

आपल्याला त्यांच्यापासून दूर करत असतात ....

कधी - कधी हे सरडे आपल्याला मोठेपण देऊन

आपल्या पाठीमागे आपल्यालाच कमी लेखत असतात ...

स्वत : च्या  स्वार्थासाठी आपला उपयोग करून

जगात प्रसंगी आपल्यालाच बदनाम करत असतात ....

अशा  सरड्यांचे  बदलणारे रंग आपल्याला

डोळ्यात तेल घालून पाहिल्यावरच दिसतात ....

आपल्या आजूबाजूला असे अनेक सरडे

बेमालूमपणे वावरत असतात ....

हलके कान असणारेच या अशा

सरड्यांची शिकार सहज ठरत असतात ...

रंग बदलणारे हे सरडेच कित्येकदा रंग

कसे बदलावे हे त्यांच्याही नकळत

इतरांना  शिकवित  असतात ....निलेश बामणे

Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: रंग बदलणारे सरडे

शशिकांत ओक
सरड्यांच्या जगात इतरांचे रंग ढंग शोधता मी ही कसा रंग बदलतो हे माझे मला कळले नाही... मग मी इतरांना का दोषी मानावे?