बदामाचे झाड

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

बदामाचे झाड

nilesh dattaram bamne


बदामाचे झाड

रस्त्याच्या कडेला आज एक बदामाचे झाड दिसले

झाडाखाली पडलेले लाल - बुंद बदाम दिसले...
 
त्यातील एखादा अलगत उचलावा मनी येवून गेले
 
डोक्यात अचानक एक विचारचक्र सुरु झाले ....
 
शाळेत जाताना ते रस्त्यात भेटणारे बदामाचे झाड आठविले

त्या झाडाखाली पडलेले बदाम दगडाने फोडून खाणे आठविले ...
 
बदाम झाडाखाली पडलेले नसतील तर हवेने ते पडण्याची वाट पाहणे आठविले

झाडाखाली पडलेले जास्तच बदाम सापडले तर त्यातील एखादा तिला देणे आठविले ....
 
आज नव्हते जिगर माझ्यात बदाम उचलून खाण्याचे झाडाखाली पडलेले

कदाचित लहानपणीचा माझा नम्रपणा जावून अहंकाराने माझे मन आज ताठ झाले ...
 
म्हणूनच एके काळी गोड लागणारे बदाम आज नकोसे वाटले

एके काळी मित्र असणारे बदामाचे झाड आज अचानक अनोळखी झाले ..........

कवी - निलेश बामणे