शतजन्म शोधिताना.....

classic Classic list List threaded Threaded
4 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

शतजन्म शोधिताना.....

Mukund
ठरवून मुलुख सारा,भिजून परतलो मी
कळ आतल्या जीवाची,चेतवून परतलो मी |
अतृप्त आर्त वारा,त्रासून प्राशिला मी
मर्जी नसे मनाची,भिजवून चाललो मी ||

बेरंग या जगाला, रंगून टाकताना
रुधीरार्त आर्त  माझे हलकेच सांडताना |
तुज रंग रंजीताचा,रक्तरंज हा दिसेना
मनी माझिया सखी हे,काहूर हासवेना ||

न्हावून घे बरे  तू ,आसुसल्या सुखाने  
दुखवू कसा पुन्हा मी बोलू कुण्या मुखाने?
कोंडून दुःख सारे,विस्फोट आज व्हावे
हे देह संचिताचे,भेदून लाख्लाखावे ||

येशील का जगी तू,बनुनी पुन्हा धरा ती
मी मूक (कि मुक्त )मेघ नभीचा,बरसेल बेहीसाबी |
सोसून वेड सारे,रुजूदे पुन्हा मलाही
समजू नकोस काटा,मी पुष्प ते गुलाबी ||

रुजुनि तुझ्या ऊराशी,इकवार जन्म घ्यावा
हर याक्ष-प्रश्निकाला,जगुनी जवाब द्यावा |
ते मूक प्रेम माझे,स्पर्शून सांगताना
देईन साथ तुजला,शतजन्म शोधिताना.... ||

व्यथा कधी न कळली .हि कथा असे कोणाची?
"नभ-आर्त धरित्रीची" वा "प्रेम-प्रेमिकांची"  |
मज पामरे बळेची इतुकेच फक्त झाले
ते दिव्य प्रेम त्यांचे, मी शब्दबद्ध केले    ||

                                              -मुकुंद.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: शतजन्म शोधिताना.....

Siddheshwar Vilas Patankar
मित्रा असा मध्येच थांबू नको , लिहित जा . तुझ्याकडे आहे ते सर्व जे एका कविकडे असावे लागते . दुख आणि सुख ,क्षण वैफ़ल्य सर्व पत्रावर येवून देत
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: शतजन्म शोधिताना.....

Mukund
प्रिय मित्र,

आज तुझा mail वाचला. वाचून आनंद झाला. खूप काळ लोटला तरी ई- साहित्य कडून प्रतिसाद मिळाला नाही. माझी कविता प्रकाशित झाली किंवा नाही तेही मला माहित नाही. तेंव्हा निराश होणे स्वाभाविक नाही का? मी आजही लिहित आहेच.माझी कविता हे माझ्या मनाच आणि माझ हितगुज असत तेंव्हा ते थांबवण आता मला तरी शक्य नाही. एक काव्य संग्रह व्हावा एव्हड एका विषयाशी संबंधित लिखाण माझ्याकडे उपलब्ध नाही, पण संमिश्र स्वरूपातील बरचसं लिखाण मी करून ठेवलेलं आहे. शक्य असेल तर मला फक्त हाक मार मी उत्सुक आहे तुझ्या माध्यमातून माझ हितगुज जगासमोर मांडायला.

एक शेवटची विनंती, माझी कविता जर प्रकाशित केली असशील तर कशी शोधावी ते सांगशील कारण तुझ्या mail सोबत असलेली लिंक आता अस्तित्वात नाही.
ई-साहित्यला खूप खूप शुभेच्छा. कळावे. लोभ असावा.2016-05-24 11:27 GMT+05:30 Siddheshwar Vilas Patankar [via ई-साहित्य] <[hidden email]>:
मित्रा असा मध्येच थांबू नको , लिहित जा . तुझ्याकडे आहे ते सर्व जे एका कविकडे असावे लागते . दुख आणि सुख ,क्षण वैफ़ल्य सर्व पत्रावर येवून देत
पाटणकर सिद्धेश्वर विलासIf you reply to this email, your message will be added to the discussion below:
http://x.2286687.n4.nabble.com/-tp4640899p4641554.html
To unsubscribe from शतजन्म शोधिताना....., click here.
NAML--
Parag Deshmukh.

Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: शतजन्म शोधिताना.....

siddheshwar
अरे एवढ्यात निराश होवून कस चालेल ? तुझी दुखं दुसर्यालाही आपली वाटू शकतात . तेव्हा लिहित जा. तू छान लिहू शकशील जर सवय लावून घेतलीस तर. वाचकांचा प्रतिसाद मिळो अथवा न मिळो .
मी देखील तुझ्याच नावेतील प्रवासी आहे. मला प्रकाशनाची हौस नाही . मी मुक्त आहे . माझ्या कविता मी खालील साईटवर देखील टाकल्या आहेत . तू पण तेथे लिहू शक्तोस.

१) ग्लोबल मराठी कविता
२) मराठी कवितांचे माहेरघर

पण लिहीन थांबवू नकोस हि नम्र विनंती . भावना विलीन करायच्या नसतात तर मांडायच्या असतात . त्या दुसर्यांसाठी वाटा ठरू शक्तात. लिहिह्त जा . शुभम भवतु