आला पाऊस गेला पाऊस

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आला पाऊस गेला पाऊस

Bhalchandra Bhutkar
आला पाऊस गेला पाऊस
माझ्याकरिता माझ्यासोबत
चिंब एकदा भिजला पाऊस

आज अंत हा पाहून गेला
उगा चौकशी करून गेला
दोन क्षणांची चुकली गणिते
पाठ पुन्हा ही फिरवून गेला
मला पावसा घाल अन्हिके


तुझे पोर हे असे लाडके
तुझीच माया तुझीच दुनिया
तुझेच सारे तुझेच खेळ
अंबरातुनी तुझ्याच त्याही
माझ्यासाठी हसला पाऊस

आला पाऊस गेला पाऊस  ....

एकांती तव पैंजणा चे
भास होता क्षणोक्षणी
नकळत कानी गुंजन करिती
पुन्हा नव्याने जुनीच गाणी
नको सखी हा विरह आताशा
अंतरातुनी ओसांडून बघ
नसांनसांतून भिनला पाऊस

आला पाऊस गेला पाऊस
उनाड अल्लड लेकरापरी
ढगात पुन्हा दडला पाऊस

माझ्याकरिता माझ्यासोबत
चिंब एकदा भिजला पाऊस ...
--  भालचंद्र