प्रमाणपत्र

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

प्रमाणपत्र

nilesh dattaram bamne
प्रमाणपत्र
तुला पाहिलं कि मी कासावीस होतो
प्रेमाने नव्हे ...रागाने ...
कारण तुझा चेहरा मला माझ्या
अपयशाचा साक्षीदार वाटतो............
तुझ खळखळून हसण मला माझ्या अपयशावर
विनोदाने पिटल्या जाणाऱ्या टाळ्या वाटतात ................
तुझ माझ्याकडे पाहंत ...डोक्यावरून हात फिरवण
मला तुझ्या केसातील पांढरा केस
झाल्याची जाणीव करून देत ..........
तुझ्या ओठावरील लाल लिपस्टिक
तू किती क्रूर आहेस हे पटवून देत.........
तुझ्या चेहऱ्यावर थापलेला मेकप
मला माझ्या मूर्खपणाची जाणीव करून देत ............
कारण तुझ्या अंतर्मनाचा अभ्यास न करता
तुझ्या चेहऱ्याला मी भुललो
आणि क्षणिक आकर्षणाला प्रेम समजून
तुझ्या मागे वाहवत गेलो
नंतर कळल तू तर प्रमाणपत्रच होतीस
कित्येकांसाठी त्यांच्या अपयशी प्रेमाच......

कवी- निलेश बामणे