दुष्काळ

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

दुष्काळ

nilesh dattaram bamne
दुष्काळ
शून्यात चित्त लावून विचार करतो मी जेव्हा,
तेव्हा स्वतालाच प्रश्न विचारतो की त्या दुष्काळग्रस्तानपैकी
मी ही एक असतो तर कसा टिकलो असतो दुष्काळात .....

दिवसाला १५० लिटर पाण्याची विल्हेवाट लावणारा मी
कसा जगलो असतो अथक परिश्रम करून मिळविलेल्या
त्या हंडाभर पाण्यात....

पाण्यासाठी पाण्याविना उन्हातान्हात भटकताना
काळा पडलेला माझा चेहरा न धुता मलाच
कसा दिसला असता आरश्यात.....

स्वताच्या मालकीची कित्येक एकर जमीन असताना
पोटापाण्यासाठी निर्वासितासारखा माझ्याच राज्यात
भटकताना मी कसा दिसलो असतो चारचौघात ....

पाणी मिळवलही असत पायपीठ करून
पण ! पोट भरायला अन्न लागत
काबाड कष्ट न करता
ते कोठून सारल असत पोठात...

राहून राहून एकच प्रश्न मला सतावतो
आजच्या कलियुगात एक माणूसच
का पाहतो दुसऱ्या माणसाला पाण्यात ....

दुष्काळग्रस्तानपैकी नसलो म्हणून काय झाल
त्यांच्या वेदना माझ काळीज चिरतात
याचा अर्थ माझ्यातील माणूस आजही जिवंत आहे.....

कवी - निलेश बामणे